मुंबई - सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असे म्हटले जाते. अनेक सामाजिक विषय मोठ्या पड्यावर वास्तववादी साकारले जातात. यातून समाजातील भीषण वास्तव समोर येत असतं. अलिकडेच 'छपाक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि दीपिका पदुकोणच्या भूमिकेचे कौतुक झालं. अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीची ही सत्यकथा आहे. खरंतर यापूर्वीही असे विषय चित्रपटातून हाताळण्यात आले. मात्र, कुणाला प्रसिद्धी मिळाली तर कोणी यापासून दूर राहिले.
'छपाक'च्या पूर्वी अशा विषयाचे चित्रपट रिलीज झाले होते. 'उयारे' या दाक्षिणात्य चित्रपटात अभिनेत्री पार्वती थिरुवोथु हिने अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीची भूमिका साकारली होती. 'छपाक'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता पार्वती थिरुवोथु हिच्या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे.