महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तारक मेहता..'ची अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल - Moonmoon Datta's insulting statement

अभिनेत्री मुनमुन दत्ताने दलित समाजाबद्दल केलेले वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे. अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Moonmoon Datta
मुनमुन दत्ता

By

Published : May 29, 2021, 6:43 PM IST

मुंबई - 'तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा' या मालिकेमध्ये बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताने दलित समाजाबद्दल केलेले वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे. अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ता हिने एका व्हिडीओमध्ये दलित समाजाबद्दल जातिवाचक शब्द वापरला होता. त्यामुळे दलित समाजाने याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी आता अंबोली पोलीस स्टेशनमध्ये मुनमुन दत्ताच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम (अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट) 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुनमुन दत्ताच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

मुनमुन दत्ता हिने 10 मे रोजी हा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. यावेळी 'क्‍योंकि मैं यूट्यूब में आने वाली हूं और मैं अच्‍छा द‍िखना चाहती हूं, '....' की तरह नहीं द‍िखना चाहती.' असं सांगत असताना तिने वाल्मिकी समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. याबद्दल अंबोली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, आता गुन्हा दाखल झाला आहे.

मुनमुन दत्ता हिने 10 मे रोजी हा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. यावेळी 'क्‍योंकि मैं यूट्यूब में आने वाली हूं और मैं अच्‍छा द‍िखना चाहती हूं, '....' की तरह नहीं द‍िखना चाहती.' असं सांगत असताना तिने वाल्मिकी समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. याबद्दल अंबोली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, आता गुन्हा दाखल झाला आहे

हेही वाचा - सलमानचे वडील सलीम खान म्हणाले, "'राधे' हा अजिबात उत्तम चित्रपट नाही"

ABOUT THE AUTHOR

...view details