कलाकारांच्या जीवनात बरेच उतार-चढाव येत असतात. हल्लीची कलाकार मंडळी आपल्या शरीरावर कडक मेहनत घेताना दिसतेय. अभिनेते ‘सिक्स पॅक्स’ तर अभिनेत्री ‘झिरो फिगर’ मिळविण्यासाठी धडपडताना दिसतात. आपले मराठी कलाकारही यात मोडतात. आता अभिनेत्री मोनालिसा बागलचं उदाहरण घ्या ना. ही सुंदर अभिनेत्री नेहमीच फिट होती तरीही तिने लॉकडाऊन मध्ये ‘टाइम-पास’ म्हणून चक्क आपलं वजन घटवलं, ज्याचा तिला पुढील प्रोजेक्टस साठी उपयोगी पडेल.
नवीन वर्षात सर्वकाही सुरळीत चालू होते. सिनेमाचे शूटिंग सुरू झाले होते. नवीन वर्षाची नवी उमेद मिळाली होती. आणि असं असताना सिनेसृष्टीला देखील ब्रेक लागला. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा मोनालिसा बागलने पुरेपूर वापर केला, स्वतःला वेळ दिला, आरोग्याची काळजी घेतली. तिने वजन कमी करण्याकडे विशेष लक्ष दिले.
त्यावेळी एका सिनेमासाठी ती वजन कमी करत होती आणि पुन्हा लॉकडाऊन आला. पण आता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत, फिटनेसकडे पूर्णपणे लक्ष देत, योग्य डाएट करून मोनालिसा कमी केलेले वजन तसेच मेन्टेन करण्याकडे विशेष लक्ष देतेय.