मुंबई -आपल्या सहज सुंदर अभिनयाने लाखो करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री काजोलचा आज (५ ऑगस्ट) वाढदिवस आहे. अभिनेता अजय देवगनसोबत तिचे लग्न झाले आहे. मात्र, दोघेही एकमेकांना भेटण्यापूर्वी ते दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. काजोलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या भन्नाट अशा लव्हस्टोरीबद्दल...
काजोलने बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. विशेषत: शाहरुखसोबतची तिची जोडी आजही चाहत्यांच्या काळजात घर करुन आहे. 'कुछ कुछ होता है', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'बाजीगर' यांसारख्या बऱ्याच चित्रपटातील तिच्या भूमिका आजही लोकप्रिय आहेत.
तिच्या करिअरच्या सुवर्णकाळात तिने अभिनेता अजय देवगनसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला होता. ९० च्या दशकात दोघांची 'हलचल' चित्रपटादरम्यान ओळख झाली. सुरुवातीला अजय फार कमी बोलायचा. त्यामुळे त्यांची मैत्री व्हायला वेळ लागला. दोघे एकमेकांचे मित्र बनण्यापूर्वी दुसऱ्या व्यक्तीसोबत नात्यात होते.