मुंबई- 'घाडगे अॅण्ड सून' या मालिकेत आता लवकरच सौदामिनी नावाच्या पात्राची एन्ट्री होणार आहे. ही भूमिका महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हर्षदा खानविलकर साकारणार आहे. तेव्हा सौदामिनी कडकडेच्या मालिकेत येण्याने मालिका कुठल्या वेगळ्या वळणावर येईल हे पाहणे रंजक असणार आहे. हर्षदा खानविलकर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत मालिकेमध्ये दिसणार आहेत.
'घाडगे अॅण्ड सून' मालिकेत हर्षदा खानविलकरची एन्ट्री, दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत - marathi serial
हर्षदा खानविलकर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत मालिकेमध्ये दिसणार आहेत. मालिकेमध्ये सौदामिनी म्हणजेच हर्षदाच्या एन्ट्रीमुळे मालिकेतली रंजकता अधिकच वाढेल यात काही शंका नाही.
सौदामिनी आणि घाडगे कुटुंबाचा काय संबंध आहे ? कियाराचा हा डाव तर नाही ना ? येत्या भागांमध्ये सौदामिनी घाडगेंना इंटरोगेट का करणार ? सौदामिनीला पुरुषांविषयी विशेष चीड आहे, त्यामुळे कियाराच्या बोलण्यात येऊन ती अक्षय आणि घाडगे यांना जबाबदार धरणार का ? अमृता यामधून कसा मार्ग काढेल ? हे सगळं मालिका पाहिल्यावरच कळेल. घाडगे अॅण्ड सून मालिकेमध्ये सध्या संपूर्ण घाडगे कुटुंब कियाराच्या कारस्थानांनी आणि डावपेचांनी त्रस्त झाले आहे.
या सगळ्यामध्ये अमृता आणि माई मार्ग काढण्याचा प्रयत्नदेखील करत आहेत. परंतु प्रत्येक वेळी कियाराची खेळी मात्र सगळ्यांना भारी पडत आहे. तिचा खोटेपणा, गरोदर आहे असं सांगणं, घाडगे परिवाराला तिच्या वडिलांनी ब्लॅकमेल करणं, यातून अमृता काय आणि कसा मार्ग काढेल, हे पाहणे रंजक असणार आहे. हे घडत असतानाच मालिकेमध्ये सौदामिनीच्या एन्ट्रीमुळे मालिकेतली रंजकता अधिकच वाढेल यात काही शंका नाही.