महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेत्री सौजन्याची सिलींग फॅनला लटकून आत्महत्या - Suicide of actress Soujanya

कन्नड टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री सौजन्याने आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या बेडरूममध्ये बंगळुरूच्या घरातून सापडला. खोलीतून एक सुसाईड नोटही सापडली आहे.

अभिनेत्री सौजन्याची आत्महत्या
अभिनेत्री सौजन्याची आत्महत्या

By

Published : Sep 30, 2021, 5:52 PM IST

बंगळुरू - फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री सौजन्याने आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या बेडरूममध्ये बंगळुरूच्या घरातून सापडला. प्राथमिक तपासात पोलिसांनी सांगितले आहे की खोलीचा दरवाजा आतून बंद होता. जेव्हा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा अभिनेत्रीचा मृतदेह खोलीत फासाला लटकलेला होता. अभिनेत्री सौजन्याच्या पायांवर असलेल्या टॅटूच्या चिन्हांनी तिची ओळख पटली. खोलीतून एक सुसाईड नोटही सापडली आहे.

अभिनेत्री सौजन्या

बंगळुरूच्या घरात एकटीच राहत होती सौजन्या

अभिनेत्री सौजन्या बंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील कुंबलगोडू येथील एका अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती. सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीने तिच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. अशा परिस्थितीत पोलीस आत्महत्येचा शोध घेत आहेत. सौजन्या ही मूळची कोडगु जिल्ह्यातील कुशालनगर येथील होते. अभिनेत्री सौजन्याने हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याबद्दल तिच्या सुसाईड नोटमध्ये कुटुंबाची माफी मागितली आहे. ही सुसाईड नोट 27 सप्टेंबर रोजी लिहिली होती.

आजवर पाठिंबा दिलेल्यांचे सैजन्याने सुसाईड नोटमध्ये आभार मानले आहे

अभिनेत्री सौजन्याची सुसाईड नोट

या चिठ्ठीमध्ये अभिनेत्री सौजन्याने नैराश्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात पोलीस आता सौजन्याचे पालक आणि त्यांच्या मित्रांची चौकशी करत आहेत. पोलिसांना हे जाणून घ्यायचे आहे की अभिनेत्री सौजन्याने स्वतः ही गोष्ट केली आहे की यासाठी तिच्यावर दबाव होता? सौजन्याने सुसाईड नोटमध्ये असेही लिहिले आहे की तिला कोणताही आजार नव्हता, पण ती मानसिक समस्यांनी ग्रस्त होती. चिठ्ठीत, तिने अशा काळात ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्या सर्वांचे आभार मानले आहेत.

कुटुंबीयांसोबत अभिनेत्री सौजन्या

कन्नड फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीला धक्का

सौजन्याने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. ती अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांचाही भाग राहिली आहे. सौजन्याने ज्या लोकांसोबत काम केले आहे त्यांच्याकडून पोलीस काही धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बातमी कन्नड उद्योगासाठीही धक्कादायक आहे, कारण काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री जयश्री रमैया हिनेही आत्महत्या केली होती. मानसिक आजार आणि संघर्ष हेही तिच्या आत्महत्येमागील कारण असल्याचे मानले जात होते. या वर्षाच्या सुरुवातीला, 'बिग बॉस कन्नड' फेम चैत्रा कुटूरनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा - बॉलिवूडच्या चित्रपटांची ‘प्रदर्शन घाई’, रसिक मायबाप ठरवणार भवितव्य!

ABOUT THE AUTHOR

...view details