मुंबई - अभिनेत्री अस्मिता देशमुख सुद्धा नेहमीच वेगळ्या भूमिका करायला प्राधान्य देते. तिला ‘देवमाणूस २’ मधील डिम्पल हे पात्र करायला मिळालं तेव्हापासून ती खूष आहे. परंतु अलीकडेच तिला असा प्रसंग चित्रित करावा लागला ज्यासाठी अस्मिताने शूटिंग करण्यासाठी नकार दिला होता.
देवमाणूस या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतात. या मालिकेतील प्रसंग प्रेक्षकांना थक्क करतात. नुकतंच या मालिकेतील प्रमुख भूमिका निभावणारा अभिनेता किरण गायकवाड याने नुकतंच एक प्रसंग चित्रित करताना थक्क झाला असल्याचं सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना सांगितलं. मालिकेचं चित्रीकरण करत असताना असा काही प्रसंग चित्रित करावा लागेल अशी कल्पना देखील नव्हती असं देखील तो म्हणाला. हा नक्की कुठला प्रसंग आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
Devmanus 2 : “डिंपल नाम सून के सिंपल समझे क्या.. अस्मिताला लागले पुष्पाचे वेड - अभिनेत्री अस्मिता देशमुख
देवमाणूस या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतात. या मालिकेतील प्रसंग प्रेक्षकांना थक्क करतात.
डिंपलच्या भूमिकेने दिली लोकप्रियता
मालिकेतील डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले "डिंपल या पात्राने नाव आणि ओळख मिळवून दिली.. प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.. पण नुकताच मालिकेतला एक प्रसंग चित्रित करताना अंगावर काटा आला..हा प्रसंग चित्रित करण्याआधी मी खूप घाबरले होते आणि नकारही दिला होता. पण दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी प्रोत्साहन दिल्यानंतर हा प्रसंग चित्रित झाला.”
हेही वाचा -Pondicherry : संपूर्णतः स्मार्ट फोनवर शूट झालेला पहिला मराठी चित्रपट, ‘पाँडीचेरी'!