अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाने, ज्ञानाने आणि धैर्याने इतिहासामध्ये एक अमीट ठसा उमटविला आहे आणि शतकानुशतके नंतर स्वत: चा एक वारसा तयार करून ठेवला आहे. हे शक्य झाले ते तिच्या ध्येयवादी स्वभावामुळे, धैर्यामुळे आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास असल्यामुळे. त्यातच तिचे सासरे ‘मल्हारराव होळकर’ यांच्याकडून मिळालेल्या अतूट आणि बिनशर्त पाठिंब्यामुळे. ते नेहमीच अहिल्याच्या मतांवर विश्वास दाखवीत आणि त्यांना खात्री होती ती तिच्या विचारांच्या समर्थपणाची आणि त्यांना विश्वास वाटत होता की अहिल्यामध्ये भविष्यात मोठे काहीतरी करण्याची क्षमता आहे. म्हणूनच ते तिच्या आयुष्यात खंबीर आधारस्तंभ म्हणून उभे राहिले.
सोनी एन्टरटेन्मेंटच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत अहिल्याबाई होळकर या मुख्य भूमिकेत अभिनेत्री अदिती जलतारे दिसत आहे. अदिती देखील तिच्या पालकांमध्ये मल्हारराव होळकर पाहते कारण त्यांच्याप्रमाणेच ते तिला नेहमी प्रोत्साहित करीत असतात. तिला असा विश्वास आहे की पालकांच्या पाठिंब्याशिवाय तिला तिची अभिनयाची आवड आणि शिक्षण एकत्रितपणे करणे जमले नसते. अदिती म्हणते की, ‘माझे पालक माझी अभिनय आवड आणि शिक्षण या दोन्हींना समान महत्व देतात. त्यांची समर्थन प्रणाली मजबूत आहे.’
याबाबत अधिक माहिती देताना बाल-अभिनेत्री अदिती जलतारे म्हणाली, “माझे आई-वडील माझ्यावर विश्वास ठेवतात, मला जिथे पाहिजे तेथे जाण्याचा आत्मविश्वास देतात आणि मला जे पाहिजे आहे ते करायला मुभा देखील देतात. मला माझी आवड आणि शिक्षण यांच्यामध्ये कधीही एकाची निवड करण्याची गरज पडली नाही ती त्यांच्या पाठिंब्यामुळेच. या दोघांनाही खात्री आहे की मी अभिनयाची आवड जोपासताना मला शिक्षणाचे महत्त्वही तितकेच समजले आहे. माझ्या कुटुंबाने नेहमी हे सुनिश्चित केले आहे की मी माझ्या अभ्यासावर तितकेच लक्ष घालते जितके की अभिनयावर.’
अदिती जलतारे, १८ व्या शतकातील सामाजिक नियमांविरोधात जाऊन शिक्षण घेण्यासाठी धडपडणारी छोटी अहिल्या साकारतेय ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेत. ही मालिका सोमवारी ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होते.
माझे पालक माझी अभिनय आवड आणि शिक्षण या दोन्हींना समान महत्व देतात : अदिती जलतारे
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत अहिल्याबाई होळकर या मुख्य भूमिकेत अभिनेत्री अदिती जलतारे दिसत आहे. अदिती देखील तिच्या पालकांमध्ये मल्हारराव होळकर पाहते कारण त्यांच्याप्रमाणेच ते तिला नेहमी प्रोत्साहित करीत असतात. तिला असा विश्वास आहे की पालकांच्या पाठिंब्याशिवाय तिला तिची अभिनयाची आवड आणि शिक्षण एकत्रितपणे करणे जमले नसते.
अदिती जलतारे
हेही वाचा - ‘राजा’ आणि ‘रानी’ ‘जोडी’ने खेळणार होळी!