महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांचे ‘दिवाळी’ बाबत मनोगत! - popular Zee Marathi series

भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. यंदाचा हा दीपोत्सव खूप सकारात्मकता घेऊन आलाय. गेल्यावर्षी कोरोनामुळे कोणालाही मनाप्रमाणे दिवाळी साजरी करता आली नव्हती. कदाचित त्यामुळेच यावर्षीचे दिवाळी सेलिब्रेशन सर्वांसाठीच खास आहे. झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांनी ‘दिवाळी’ बाबतचे आपले मनोगत व्यक्त केले आहे.

कलाकारांचे ‘दिवाळी’ बाबत मनोगत
कलाकारांचे ‘दिवाळी’ बाबत मनोगत

By

Published : Nov 6, 2021, 10:27 PM IST

भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. यंदाचा हा दीपोत्सव खूप सकारात्मकता घेऊन आलाय. गेल्यावर्षी कोरोनामुळे कोणालाही मनाप्रमाणे दिवाळी साजरी करता आली नव्हती. कदाचित त्यामुळेच यावर्षीचे दिवाळी सेलिब्रेशन सर्वांसाठीच खास आहे. झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांनी ‘दिवाळी’ बाबतचे आपले मनोगत व्यक्त केले आहे.

कलाकारांचे ‘दिवाळी’ बाबत मनोगत

अदिती सारंगधर (मालविका - येऊ कशी तशी मी नांदायला) - कोरोना महामारी बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने यंदा येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या शूटिंगमधून वेळ काढून जिव्हाळ्याच्या माणसांना प्रत्यक्ष भेटून दिवाळी साजरी करता येणार असल्याने ती खास आहे. यंदाची दिवाळी ही गेल्या वर्षीच्या दिवाळीसारखी नसेल हा विचारच सुखावणारा आहे. फराळापेक्षा मित्र मैत्रिणी आणि नातलगांच्या भेटीचा गोडवा यंदाच्या दिवाळीची रंगत वाढवेल. या वर्षीचे दिवाळीचे कार्यक्रम प्रेक्षकांना प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊन पाहता येणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे यंदा लॅपटॉप समोर साजरी केलेली व्हर्चुअल दिवाळी पहाट नसेल.

कलाकारांचे ‘दिवाळी’ बाबत मनोगत

शाल्व किंजवडेकर (ओम - येऊ कशी तशी मी नांदायला) - नाट्यगृह आणि चित्रपटगृहांचे दरवाजे उघडल्यामुळे यंदाची दिवाळी कलाकारांसाठी खास आहे. त्यामुळे मी दिवाळीची आतुरतेने वाट पाहत होतो. गेल्या कित्येक महिन्यांपासून मनावर साठलेलं मळभ दूर करणारी यावर्षीची दिवाळी सर्वाथाने वेगळी आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून मी माझ्या परिवारासोबत दिवाळी साजरी करणार आहे. तसेच या मालिकेच्या टीमसोबत देखील या सणाचा आनंद लुटणार आहे.

कलाकारांचे ‘दिवाळी’ बाबत मनोगत

हार्दिक जोशी (सिद्धार्थ, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं) - माझ्या मते आपले सण जपण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. घरी मी दिवाळी ही पारंपरिक पद्धतीने साजरी करतो. पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून उटणं लावून अंघोळ करणं, कारेट फोडण, मित्रपरिवाराला भेटणं त्यांच्या सोबत फराळाचा आस्वाद घेणं आशा प्रकारे मी दिवाळी साजरी करतो आणि आपण हा सण असाच पारंपरिक पद्धतीने साजरा केला पाहिजे जेणेकरुन पुढील पिढीमध्ये देखील हा सण सुट्टी म्हणून नाही तर एक सण म्हणून जीवंत राहील.

कलाकारांचे ‘दिवाळी’ बाबत मनोगत

मी माझ्या घरी माझ्या परिवारासोबत दिवाळसण साजरा करणार आहे. मी आईला घरी साफसफाईसाठी, फराळात चकल्या आणि शंकरपाळ्या करायला मदत करायचो पण तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे मी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घरी जातोय त्यामुळे ही मदत फारशी आता करता येणार नाही. तसंच फटाके फोडताना प्राण्यांची काळजी घ्या कारण फटाक्यांच्या आवाजाचा त्रास आपल्यापेक्षा ३ पटीने जास्त त्यांना होतो त्यामुळे माणुसकी जपून सण साजरा करा, एकत्र येऊन आनंदानं सण साजरा करा.

कलाकारांचे ‘दिवाळी’ बाबत मनोगत

झी मराठीच्या मालिकांमध्येही दिवाळी साजरी होताना दिसली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत ऑफिसमध्ये दिवाळी निमित्त पूजा केली गेली. आजोबांपासून परीपर्यंत सगळी मंडळी एकत्र जमून फराळाचा आस्वाद घेतला. घेणार आहेत. ‘मन उडु उडु झालं’ मालिकेत दिवाळसणासाठी देशपांडे कुटुंबातील बाबा गावाहून घरी आले आहेत. इंद्राला दिपू आवडू लागली आहे आणि आपण तिच्या प्रेमात आहोत याची जाणीव इंद्राला झाली आहे. यंदा दिवाळीत दिपूला एखादा खास सरप्राईज देण्याचा त्याचा मानस आहे. दोन्ही कुटुंबांनी आनंदानं दीपोत्सव साजरा केला.

कलाकारांचे ‘दिवाळी’ बाबत मनोगत

‘तुझ्या माझ्या संसाराला’ या मालिकेत देखील दिवाळी निमित्त अनेक ट्विस्ट्स पाहायला मिळतील. ‘मन झालं बाजिंद’ मध्ये दिवाळी हा पहिला सण राया आणि कृष्णाच्या लग्नानंतर आल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे. घरातल्यांच्या आनंदासाठी आपापसातील द्वेष विसरून राया आणि कृष्णा यांनी आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. सगळेजण आनंदात असताना पणती लवंडून कृष्णाच्या पदराला आग लागली आता कृष्णाला राया वाचवतो हे प्रेक्षकांना या आठवड्यात पाहायला मिळाले.

हेही वाचा - लुप्त होत चाललेल्या दिवाळी परंपरा : चला पुन्हा आनंद वाटूया...

ABOUT THE AUTHOR

...view details