महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शयंतनी घोष, सुभाशिष झा, मेघा चक्रवर्ती आणि युक्‍ती कपूर यांची मातृदिनासंबंधित मनोगतं! - mothers day

आई, माता, माँ, मदर काहीही म्हणा माता म्हणजे दैवी अवतार असतो. या ‘मदर्स डे’ ला सोनी सब वाहिनीवरील कलाकारांनी आपापल्या आईविषयी मनोगतं व्यक्त केले आहेत.

शयंतनी घोष, सुभाशिष झा
शयंतनी घोष, सुभाशिष झा

By

Published : May 9, 2021, 7:03 AM IST

Updated : May 9, 2021, 3:57 PM IST

मुंबई -आई, माता, माँ, मदर काहीही म्हणा माता म्हणजे दैवी अवतार असतो. या ‘मदर्स डे’ ला सोनी सब वाहिनीवरील कलाकारांनी आपापल्या आईविषयी मनोगतं व्यक्त केले आहेत.

युक्‍ती कपूर

'तेरा यार हूं मैं' मालिकेतील दलजीत बग्‍गाची भूमिका करणारी शयंतनी घोष म्हणाली, ''माझ्या बालपणापासून माझ्या आईने मला नेहमीच स्वावलंबत्वाची शिकवण दिली आहे. ज्‍यामुळे आज मी स्‍वावलंबी व खंबीर महिला बनू शकले आहे. मी मोठी होत असताना माझी आईच माझी पहिली जिवलग मैत्रिण होती आणि आजही ती माझी ल्‍युडो खेळामधील पार्टनर आहे. ती अत्‍यंत क्षमाशील आहे आणि नेहमीच कोणत्‍याही गोष्‍टीच्‍या सकारात्‍मक बाजूकडे पाहते. माझ्यामध्‍ये असलेल्‍या दयाळू वृत्तीचे श्रेय तिला जाते. सामान्‍यत: मी तिला पुष्‍पगुच्‍छ पाठवते तिच्‍यासाठी कूकिंग करते. यंदा आम्‍ही एकमेकींना भेटू शकणार नाही. म्‍हणून मी तिच्‍यासाठी एक केक व फुले पाठवणार आहे आणि तिचे प्रेम व तिच्‍या चांगल्‍या आरोग्‍यासाठी शुभेच्‍छा देणार आहे.''

मेघा चक्रवर्ती
‘जीजाजी छत पर कोई है' मालिकेतील जीजाजी ऊर्फ सुभाशिष झा म्हणाला, ''माझ्या आईने नेहमीच मला मार्गदर्शन केले आहे. तिच्‍याकडून मला मिळालेला सर्वोत्तम सल्‍ला म्‍हणजे कितीही प्रसिद्धी मिळाली तरी आपले पाय जमिनीवरच असले पाहिजेत आणि जीवनात कोणतेही बदल होवोत. आपण संयमी राहिले पाहिजे. मी याच शिकवणीचे अनुसरण करतो. माझी आई अत्‍यंत प्रबळ इच्‍छाशक्‍ती असलेली व्‍यक्‍ती आहे. मी तिची शिस्‍तबद्धता व आत्‍मविश्‍वास आत्‍मसा‍त केले आहे. दरवर्षी मातृ दिनी मी तिला फुले, केक व भेटवस्‍तू पाठवतो.
सुभाशिष झा,
तिच्‍यासोबतची माझी सर्वात संस्‍मरणीय आठवण म्‍हणजे मी रविवारी सकाळच्‍या वेळी तिच्‍यासोबत एका स्‍टेशनरी दुकानामध्‍ये जायचो आणि त्‍या ट्रिप्‍स खूपच रोमांचक व धमाल होत्‍या. कारण माझी आई माझ्यासाठी स्‍टेशनरी वस्‍तू, काही खेळणी खरेदी करायची. ती कधीच काही मागत नाही म्‍हणूनच तिच्‍यासोबत गप्‍पागोष्‍टी करताना तिला आवडणा-या गोष्‍टींची मी नोंद करून ठेवतो. मी तिच्‍यासाठी एखादे विशिष्‍ट उपकरण आणले, तर तिला त्‍याचा वापर कसा करावा याबाबत मदत करतो. तंत्रज्ञानप्रेमी नसल्‍यामुळे ती अनेकदा त्‍या गोष्‍टी शिकण्‍यामध्‍ये संकोचते आणि मला ते खूपच क्युट वाटते. यंदा आपल्‍याला अनोख्‍या पद्धतीने मातृ दिन साजरा करावा लागणार आहे. मी तिच्‍यासाठी स्‍पेशल ‘मॉन्टाज व्हिडिओ’ बनवत आहे.'' 'काटेलाल अँड सन्‍स‘ मालिकेतील मेघा चक्रवर्ती ऊर्फ गरिमा म्हणाली, ''माझ्या मते, आपण प्रत्‍येक दिवशी मातृ दिन साजरा करावा आणि दररोज तिला खास वाटेल असे काहीतरी करावे. माझ्या आईने मला नेहमीच मोठ्यांचा आदर करण्‍याचा आणि कामाप्रती प्रामाणिक राहण्‍याचा सल्‍ला दिला आहे. कुटुंबाची मूल्‍ये व महत्त्व समजावण्‍यापासून माझ्यामध्‍ये ती शिकवण बिंबवण्‍यापर्यंत माझ्या आईने मला सर्व गोष्‍टी शिकवल्‍या आहेत. तिने प्राण्‍यांच्‍या बाबतीत घडणा-या अन्‍यायाविरोधात उभे राहण्‍याची विचारसरणी बिंबवली आहे. जेथे ती मला उठवताना स्लिपर्स द्यायची. ज्‍यामुळे मला थंडगार जमिनीवर पाय ठेवावे लागायचे नाही. मी तिच्‍यासाठी नुकतेच किचन व घराचे नूतनीकरण केले आणि तिला खूप आनंद झाला. माझी आई कोलकात्यामध्‍ये एक लहान एनजीओ चालवते आणि भटक्‍या प्राण्‍यांची आत्‍मीयतेने व सक्रियपणे काळजी घेते.''
शयंतनी घोष
‘मॅडम सर' मालिकेतील युक्‍ती कपूर ऊर्फ करिष्‍मा सिंग म्हणाली, ''माझी आई ब्‍युटिशियन आहे आणि मी तिच्‍याकडून भरपूर काही शिकले आहे. स्थिती कशीही असो आपण नीडरपणे, सक्षमपणे आणि आनंदाने जीवन जगले पाहिजे. माझ्या मते, प्रत्‍येक मूल आपल्‍या आईच्‍या खूप जवळ असते, विशेषत: मुली! मला तिच्‍याकडून मिळालेला सर्वोत्तम सल्‍ला म्‍हणजे आपण जगामध्‍ये अल्‍पकाळासाठीच असतो आणि जीवन आनंदाने की दु:खासह जगावे हे स्‍वत:हून ठरवावे. ती नेहमीच सर्वांना लगेचच माफ करते आणि मी तिच्‍याकडून हा गुण आत्‍मसात केला आहे. बालपणापासून मी तिला कुटुंबासाठी काम करताना, अथक मेहनत घेताना पाहत आले आहे आणि ते देखील चेह-यावर आनंद ठेवून. ती माझी जिवलग मैत्रिण आहे. तिने नेहमीच मला प्रत्‍येक क्षण आनंदाने जगण्‍याचा आणि मला आनंदित करणा-या गोष्‍टी करण्‍याचा सल्‍ला दिला आहे. बालपणाबाबतची सर्वात संस्‍मरणीय आठवण म्‍हणजे माझी नेहमीच मुलीसारखा पेहराव करण्‍याची इच्‍छा होती. तिने मला मुलासारखे कपडे घातले होते आणि माझे केस देखील बारीक केले होते. तिला सोन्‍याचे दागिने खूप आवडतात. म्‍हणून तिला दागिन्‍यासोबत केक व फुले पाठवते. तिला घराची सजावट करायला देखील आवडते. म्‍हणून इंटीरिअर्सच्‍या बाबतीत मी तिला आवडणारी वस्‍तू देणार आहे.
Last Updated : May 9, 2021, 3:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details