मुंबई - लहान पडद्यावरील स्वयंपाकावरील कार्यक्रम प्रेक्षक चवीने पाहत असतात. त्यातच त्या कार्यक्रमांत सेलिब्रिटी असल्यास कार्यक्रमाची लज्जत अधिकच वाढते. आता मनोरंजनाची चव वाढणार आहे. कारण झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार एक धमाकेदार कुकरी शो, ‘किचन कल्लाकार’, ज्यात संकर्षण कऱ्हाडे दिसणार आहे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत. हा पाककलेशी संबंधीत शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या शोची रचना काय आहे संकर्षणसोबत जाणून घेऊ. या शो मध्ये कोण असणार याबाबत काहीच माहिती समोर आली नाही.
पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांची वाजणार ‘शिट्टी’, ‘किचन कल्लाकार’ मध्ये! - नवीन कुकरी शो
झी मराठीवरील प्रत्येक कार्यक्रम हा प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतो आणि त्यातील कलाकार हे देखील प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. असाच एक कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. तो अभिनेता, कवी, लेखक अशा अनेक भूमिका निभावताना प्रेक्षकांना दिसतो, पण आता संकर्षण सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Actor sankarshan karhade