मुंबई -‘हू वॉण्टस तू बी अ मिलेनियर’ हा इंग्रजीतील प्रश्नोत्तरांचा पैसे कमावून देणारा खेळ संपूर्ण जगात फेमस आहे. तो भारतात ‘कौन बनेगा बनेगा करोडपती’ नावाने प्रदर्शित झाला व महानायक अमिताभ बच्चन यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने प्रचंड लोकप्रिय झाला. तसेच त्या कार्यक्रमाच्या या लोकप्रियतेमुळे तो प्रादेशिक भाषांमध्येही खेळला जाऊ लागला आणि त्यांनाही प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळाला. मराठीत तो प्रथमतः नागराज मंजुळे सूत्रसंचालित 'कोण होणार करोडपती' नावाने प्रदर्शित झाला आणि आता तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नवीन सूत्रसंचालक घेऊन, ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, म्हणत.
सचिन खेडेकर करणार सूत्रसंचालन -
मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे ते प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. आता या वर्षी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. २०१९मध्ये सोनी मराठी वाहिनीने 'कोण होणार करोडपती' ची निर्मिती केली होती. पण गेल्या वर्षी वैश्विक महामारीमुळे हा कार्यक्रम करणं शक्य झालं नाही. आता २०२१ मध्ये सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' पुन्हा सुरू होणार आहे, मराठी प्रेक्षकांना मालामाल करण्यासाठी.
'कोण होणार करोडपती' ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी २४ मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. २४ मार्च ते २ एप्रिल यादरम्यान ८०८०० ४४ २२२ या क्रमांकावर मिसकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक स्वतःची नोंदणी करून घेऊ शकतात.
आता प्रेक्षकांना ‘करोडपती’ करण्याची सूत्र ज्येष्ठ अभिनेता सचिन खेडेकरकडे! - सचिन खेडेकर
आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे ते प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. आता या वर्षी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. २०१९मध्ये सोनी मराठी वाहिनीने 'कोण होणार करोडपती' ची निर्मिती केली होती. पण गेल्या वर्षी वैश्विक महामारीमुळे हा कार्यक्रम करणं शक्य झालं नाही. आता २०२१ मध्ये सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' पुन्हा सुरू होणार आहे.
सचिन खेडेकर