महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

#PuneethRajkumar : उद्या अंत्यसंस्कार, कांतिर्वा स्टेडियममध्ये अंत्यदर्शन, धक्क्याने दोन चाहत्यांचा मृत्यू, दोन गंभीर - पुनीत राजपूतचे निधन

दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांचे पार्थिव शहरातील कांतिर्वा स्टेडियममध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. पुनीत यांच्या अकाली निधनामुळे चाहते मोठ्या प्रमाणावर शोकात असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बंगळूरू शहरात दोन रात्री दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरात पोलिसांच्यावतीने गस्त घालण्यात येत असल्याचे बंगळूरू शहर पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.

पुनीत राजकुमार
पुनीत राजकुमार

By

Published : Oct 29, 2021, 7:50 PM IST

Updated : Oct 30, 2021, 3:02 PM IST

बंगळुरू - प्रसिध्द कन्नड अभिनेता पनीत राजकुमार यांचे काल (२९ ऑक्टोबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी शहरातील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कर्नाटक राज्यावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव कांतिर्वा स्टेडियममध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यांच्यावर कांतिर्वा स्टुडियोत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे वडील आणि आई यांच्यावर याच स्टुडियोत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर आज (३० ऑक्टोबर) रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. पण त्यांची मुलगी विदेशात आहे. तिला बंगळुरुला यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे उद्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

पुनीत राजकुमार यांच्यावर कर्नाटक सरकारच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही घोषणा केली आहे.

पुनीत राज यांचे अंत्यदर्शन

दिवंगत अभिनेता पुनीत राज यांचे पार्थिव शहरातील कांतिर्वा स्टेडियममध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने तयारी केली जात आहे. पुनीत यांच्या अकाली निधनामुळे चाहते मोठ्या प्रमाणावर शोकात असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बंगळूरू शहरात दोन रात्री दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरात पोलिसांच्यावतीने गस्त घालण्यात येत असल्याचे बंगळूरू शहर पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.

हेही वाचा - पुनीत राजकुमारचा काळजाला चटका लावणारा मृत्यू

Last Updated : Oct 30, 2021, 3:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details