महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 2, 2022, 10:35 AM IST

ETV Bharat / sitara

प्रथमेश परबला झालीय 'लग्नाची घाय'!

लय भारी म्युझिकच्या बॅनरखाली निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी 'पोरीला लागलेय लग्नाची घाय...' हे नवं कोरं गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आणलं आहे. या गाण्यात प्रथमेश परबच्या जोडीला कोमल खरात हा नवा चेहरा लक्ष वेधून घेत आहे. प्रथमेश-कोमलची अगदी सहज जुळणारी या गाण्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना मोहिनी घालणारी आहे.

पोरीला लागलेय लग्नाची घाय...नवीन गाणे
पोरीला लागलेय लग्नाची घाय...नवीन गाणे

म्युझिक व्हिडीओजना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे नवनवीन अल्बम्स बनवण्यासाठी कलाकारांचाही हुरूप वाढताना दिसत आहे. 'बॅायफ्रेंड पक्का सेल्फीश...' या गाण्याच्या यशानंतर लय भारी म्युझिकच्या बॅनरखाली निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी 'पोरीला लागलेय लग्नाची घाय...' हे नवं कोरं गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आणलं आहे. लय भारी म्युझिकची प्रस्तुती असलेल्या 'बॅायफ्रेंड पक्का सेल्फीश...' या गाण्याला रसिकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. अवघ्या दोन महिन्यांमध्ये १ लाख ३५ हजार इन्स्टाग्राम रील्स आणि १० मिलियन्स व्ह्यूज हे आकडे या गाण्याचं यश अधोरेखित करण्यासाठी पुरेसे आहेत.

मराठीतही अनेक प्रथितयश कलाकार म्युझिक व्हिडीओज मध्ये झळकताना दिसतात. आजवर नेहमीच आपल्या विविधांगी भूमिकांमुळे चर्चेत राहणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश सध्या आपल्या आगामी व्हिडीओमुळं प्रकाशझोतात आला आहे. प्रथमेशला आता 'लग्नाची घाय' झाली आहे. लय भारी म्युझिकचं हे गाणं अबालवृद्धांना ताल धरायला लावेल. 'लग्नाची घाय' हे प्रथमेशचं गाणं रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. रसिक मायबापाकडून मिळालेल्या याच प्रेमाच्या बळावर लय भारी म्युझिक 'पोरीला लागलेय लग्नाची घाय...' हे गाणं घेऊन आलं आहे.

या गाण्यात प्रथमेशच्या जोडीला कोमल खरात हा नवा चेहरा लक्ष वेधून घेत आहे. प्रथमेश-कोमलची अगदी सहज जुळणारी या गाण्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना मोहिनी घालणारी आहे. प्रथमेश आणि कोमलचा डान्स तरुणाईलाच नव्हे, तर सर्वच वयोगटातील रसिकांना आकर्षित करणारा आहे. बॅाब आणि कोमल यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. गीतकार राज इरमाली यांनी लिहिलेलं हे गाणं, राज इरमाली आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं असून, राज इरमाली यांनी संगीतबद्ध केलं आहे. किशोर दळवी यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

हेही वाचा -Miss Ukraine Warrior : 'मिस युक्रेन' बनली 'रणरागिणी', अनास्तासिया लेनाचा प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details