हैदराबाद - हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेता प्रकाश राज यांचा अपघात झाला आहे. अपघातामध्ये ते जखमी झाले असून हैदराबादमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. स्वतः प्रकाश राज यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
'एक लहानसा अपघात...एक लहानसे फ्रॅक्चर... डॉ. गुरु रेड्डी यांच्या हातून सुरक्षित हाताने शस्त्रक्रिया व्हावी यासाठी हैदराबादला उड्डाण करीत आहे. मी बरा आहे काळजी नसावी...', अशा आशयाचे ट्विट प्रकाश राज यांनी केले आहे.
प्रकाश राज हे अभिनयासोबतच सामाजिक विषयावर भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ते आपले विचार आक्रमकपणे मांडत आले आहेत. 2019 मध्ये त्यांने बंगळूरू शहरातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता.
प्रकाश राज हे कर्नाटकातील अनेक गावामध्ये पर्यावरण रक्षणासोबतच कष्टकरी जनतेसाठी सबळीकरणाचे काम करतात. यासाठी आपल्या कमाईचा मोठा भाग ते खर्च करीत असतात.
हेही वाचा - महिनाभर ‘अज्ञातवासात’ गेलेली शिल्पा शेट्टी सार्वजनिक जीवनात परतण्यास झालीय सज्ज?