मुंबई -अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच 'पती पत्नी और वौ' चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शनक लव्ह रंजनच्या 'प्यार का पंचनामा' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अल्पावधीतच तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अलिकडेच त्याने सारा अली खानसोबत 'लव्ह आज कल' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता तो 'पती पत्नी और वो'च्या रिमेकच्या शूटिंगसाठी लखनौ येथे रवाना झाला आहे.
'पती, पत्नी और वो'च्या शूटिंगला सुरुवात, कार्तिकने शेअर केला सेटवरचा फोटो - lov ranjan
'पती, पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्री दिसणार आहेत. लखनौ येथे या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे.
'पती, पत्नी और वो'च्या शूटिंगला सुरुवात, कार्तिकने शेअर केला सेटवरचा फोटो
कार्तिकने या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवरुन त्याने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचे संकेत दिले आहेत. 'पती, पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्री दिसणार आहेत. लखनौ येथे या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे.
या चित्रपटानंतर लगेच तो जान्हवी कपूरसोबत 'दोस्ताना -२'मध्येही झळकणार आहे.