महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांनी आज शिर्डीत घेतले साई समाधीचे दर्शन - Jitendra visit Sai Samadh

अभिनेता जितेंद्र यांनी शिर्डी येथे साई समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. बाबांच्या बोलवण्यावरूनच इथे आल्याचे ते म्हणाले.

Jitendra visit Sai Samadh
अभिनेता जितेंद्र

By

Published : Dec 4, 2019, 3:57 PM IST

शिर्डी - प्रसिध्द सिने अभिनेता जितेंद्रने आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत साई चरणी प्रार्थना केली. मी साईभक्त आहे, गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीला येण्याची इच्छा होती. मात्र, साईंचा आदेश होत नव्हता. आज बाबांचे बोलवणं आल्याने शिर्डीला येऊन साई दर्शन घेतल्याने प्रसन्नता वाटली असल्याचे ते म्हणाले.

जितेंद्र यांनी आज शिर्डीत पोहचुन घेतले साई समाधीचे दर्शन


सध्याच्या राजकारणाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी त्या विषयावर बोलण्याचे टाळले. ते म्हणाले, ''अभिनेता म्हणून मी 22 वर्षांपासून रिटायर्ड झालोय. त्या नंतर पुन्हा या क्षेत्रात येणार नसल्याचे मी ठरवलंय. आता मी माझ्या दोन्ही मुलांच्या मागे उभे राहण्याचे काम करतोय. त्यांच्या मागे राहुन जे करायच ते मी करतोय,'' असं जितेंद्रने माध्यमांशी बोलताना सांगितले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details