एका महिला ज्योतिषेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अभिनेता करण ऑबेरॉयला अटक केली होती. या प्रकरणातील पीडित तक्रारदार महिलेवर ओशिवरा परिसरात शनिवारी दोन अज्ञात बाईकस्वारांनी येऊन धक्काबुकी करीत धमकविल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
लैंगिक शोषण प्रकरणी करण ऑबेरॉयकडून गुन्हा मागे घेण्यासाठी पीडितेला धमक्या - Oshivara police station
लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अभिनेता करण ऑबेरॉयला अटक केली होती. या पिडित महिलेला धमकवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला आहे. याची पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.
करण ऑबेरॉय लैंगिक शोषण प्रकरण
शनिवारी या प्रकरणातील पीडित महिला ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉकला जात असताना तिच्यावर नजर ठेवून बाईकवरून आलेल्या अज्ञातांनी पीडित महिलेच्या अंगावर एक चिट्ठी फेकत अभिनेता करण ऑबेरॉय याच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकविल्याचा आरोप या पीडित महिलेने केला आहे. या चिठ्ठीत TAKE THE CASE BACK असं इंग्रजी भाषेत लिहिल्याचे सांगत महिलेवर दबाव आणण्याचा आरोप या पीडितेने केला आहे. या संदर्भात ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.