मुंबईः अभिनेता अमित साधने सोमवारी सांगितले की आपण कोरोना व्हायरसबद्दलची चाचणी केली असून अहवाल निगेटिव्ह आला आहे. प्रार्थना केलेल्या सर्व चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत.
अमितने रविवारी ट्विट करुन सांगितले की त्याची तब्येत चांगली असून सावधगिरीचा भाग म्हणून त्याने कोरोनाची चाचणी केली होती. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अमितने स्वतःची चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
अमित आणि अभिषेक बच्चन यांनी 'ब्रिथ - इन टू द शॅडो' या वेब सिरीजमध्ये एकत्र काम केले आहे. या मालिकेचे डबिंग त्यांनी एकत्र केले होते.
''तुम्ही चिंता बाळगून प्रर्थना केल्याबद्दल तुमचे आभार. ही अशी वेळ आहे की मी निगेटिव्ह आहे हे सांगताना आनंद होतोय. या संकटाशी सामना करणाऱ्या सर्वांसाठी माझी प्रर्थना. एकत्र असणे ही सर्वात मोठी शक्ती आहे,'' असे अमित साधने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे..