महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पुष्पवल्लीला पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल - अभिज्ञा भावे - Abhijna Bhave in Tu Teva Tashi

‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून अभिज्ञा भावे छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा प्रेक्षकांना पुष्पवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिज्ञा भावे
अभिज्ञा भावे

By

Published : Mar 22, 2022, 10:00 AM IST

स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच 'तू तेव्हा तशी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली. या मालिकेत प्रेक्षकांचा अजून एक आवडता चेहरा एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे या मालिकेची उत्सुकता अजूनही वाढली आहे. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून अभिज्ञा भावे छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा प्रेक्षकांना पुष्पवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिज्ञा भावे

अभिनेत्री अभिज्ञा भावे ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिज्ञाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेबद्दल अभिज्ञा म्हणाली, "सो ऑफिशिअली मी तुम्हाला पुन्हा भेटायला येते आहे एका अशा भूमिकेत जी मला याआधी करायला मिळाली नव्हती. मी आशा करते की प्रेक्षकांकडून मला भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळेल, कारण माझी मेहनत १०० पटीने जास्त असणार आहे."

अभिज्ञा भावे

आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना अभिज्ञा पुढे म्हणाली, "प्रेक्षकांनी मला आजवर अनेक नकारात्मक भूमिकांमध्ये पाहिलंय आणि माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरून प्रेम केलं. पण तू तेव्हा तशी मधली भूमिका खूपच वेगळी आहे. मी या मालिकेत पुष्पवल्ली नावाची भूमिका निभावतेय. पुष्पवल्लीला पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल याची मला खात्री आहे."

‘तू तेव्हा तशी‘ ही मालिका झी मराठीवर प्रसारित होत आहे.

हेही वाचा -Blackbuck Poaching Case : सलमान खानच्या शिकार प्रकरणांच्या याचिका हस्तातंरित करण्यास न्यायालयाची परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details