‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून अभिनेत्री अभिज्ञा भावे प्रेक्षकांच्या नजरेत भरली. ‘कट्टी बट्टी’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’ सारख्या मालिकांतून अभिज्ञाने विविधांगी भूमिका केल्या आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तिने सर्वांची मने जिंकली. आता ती अजून एका नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आता अभिज्ञा भावे स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकर यांना साथ द्यायला येतेय.
झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या आगामी मालिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे. या मालिकेची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांचा अजून एक आवडता चेहरा एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिज्ञाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतून देखील अभिज्ञा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.