मुंबई - मराठी बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा अभिजीत बिचुकले धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज झालाय. आजच्या भागात त्याची दमदार एन्ट्री पाहायला मिळेल. मैंने एकबार कमीटमेंट करली तो...असा फल्मी डायलॉग म्हणत तो बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना दिसणार आहे.
कळंबा जेलमधून सुटलेला बिचुकले बिग बॉसच्या घरात दाखल; पुन्हा होणार धिंगाणा - अभिजीत बिचकुले
चेक बाऊन्स प्रकरणी बिग बॉसच्या घरातून अटक झालेला अभिजीत बिचकुले पुन्हा बिग बॉसमध्ये परतला आहे. महिनाभर गजाआड घालवल्यानंतर त्याला अखेर जामीन मिळाला. त्यानंतर तो कोल्हापूरहून थेट बिग बॉसच्या घरात दाखल झाला.
अभिजीत बिचुकले हा अनेक कारणांनी वादग्रस्त स्पर्धक होता. त्याच्यावर खंडणी, चेक बाऊन्स असे गुन्हे दाखल आहेत. अशाच एका प्रकरणात त्याला बिग बॉसच्या सेटवरुन अटक झाली होती. त्यांनंतर त्याची रवानगी कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये करण्यात आली होती. अखेर महिनाभर गजाआड घालवल्यानंतर त्याला अखेर जामीन मिळाला. त्यानंतर तो कोल्हापूरहून थेट बिग बॉसच्या घरात दाखल झाला.
अभिजीत बिचुकले हा मुळचा सातारचा आहे. सतत प्रसिध्दीत राहण्यासाठी तो वाट्टेल ते उद्योग करीत असतो. त्याच्या या उपद्व्यापामुळेच त्याला बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली. पण अगोदर केलेले उद्योग त्याच्या पाठीशी लागले. त्याच्यावर दाखल असलेल्या चेक बाऊन्सच्या गुन्ह्यासाठी त्याला अटक झाली. आता तो पुन्हा बिग बॉसमध्ये परतलाय. तो कळंबा जेलमधून परतताना साताऱ्याहून कंदी पेढे आणायला विसरलेला नाही. आता त्याचा बिग बॉसच्या घरात कसा धिंगाणा पाहायला मिळणार हे काळच ठरवेल.