महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नेहा पेंडसेवर 'अभिनंदना'चा वर्षाव नेमका कशासाठी ? - Shruti Marathe

नेहा पेंडसेचा साखरपुडा झालाय की ती बिग बॉसमध्ये जाणार आहे या चर्चेला आता उधाण आलंय. कारण आहे अभिजीत खांडकेकरने शेअर केलेला हा फोटो.

नेहा पेंडसेवर अभिनंदनाचा वर्षाव

By

Published : Apr 30, 2019, 5:47 PM IST

अभिनेत्री नेहा पेंडसेवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय. कशाबद्दल हे फक्त तिलाच माहिती आहे. सोशल मीडियावर तिच्या एका फोटोची जोरदार चर्चा आहे. हा फोटो शेअर केलाय अभिनेता अभिजीत खांडकेकर याने.

या फोटोत नेहाला काही अभिनेत्रींनी घेरलंय. यात नेहा पेंडसेसोबत श्रुती मराठे, हेमांगी कवी आणि अभिजीत हे कलाकार आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिजीतने लिहिलंय, 'अभिनंदन.'

या कॅप्शनमुळे अनेकांचा गोंधळ उडालाय. सध्या मराठी कलाकारांमध्ये बिग बॉसची हवा आहे. नेहा पेंडसे बिग बॉसमध्ये सिलेक्ट झालीय म्हणून हे अभिनंदन होतंय अशी एक चर्चा आहे. तर तिचा साखरपुडा झाल्याची अफवाही पसरत आहे. मात्र या सर्व अफवा असल्याचा खुलासा नेहाने केलाय. त्यामुळे हे अभिनंदन नेमके कशासाठी या चर्चेचा फड रंगताना दिसतोय.

ABOUT THE AUTHOR

...view details