महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिजीत बिचुकलेची हिंदी बिग बॉसमधील वाइल्डकार्ड एंट्री रखडली - बिग बॉसचा माजी स्पर्धक अभिजीत बिचुकले

बिग बॉसच्या घरातील सर्वात खालच्या ६ स्पर्धकांची नावे घोषित केल्यानंतर, चॅनलने लवकरच घरामध्ये वाइल्डकार्ड एंट्री देण्याच निर्णय घेतला होता. पण मराठी बिग बॉसचा माजी स्पर्धक अभिजीत बिचुकले याच्यामुळे वाईल्ड कार्ड एन्ट्री पुढे ढकलण्यात आली आहे.

अभिजीत बिचुकले
अभिजीत बिचुकले

By

Published : Nov 24, 2021, 9:13 PM IST

कलर्स टीव्हीच्या रिअॅलिटी शो बिग बॉस १५ च्या निर्मात्यांनी बिग बॉसच्या घरात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेनंतर देशातील सर्वात मोठ्या रिअलिटी शोचे रेटिंग वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शोमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत.

घरातील सर्वात खालच्या ६ स्पर्धकांची नावे घोषित केल्यानंतर, चॅनलने लवकरच घरामध्ये वाइल्डकार्ड एंट्री देण्याच निर्णय घेतला होता. पण मराठी बिग बॉसचा माजी स्पर्धक अभिजीत बिचुकले याच्यामुळे वाईल्ड कार्ड एन्ट्री पुढे ढकलण्यात आली आहे.

अभिजीत बिचुकलेची हिंदी बिग बॉसमधील वाइल्डकार्ड एंट्री

वास्तविक, कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, प्रत्येक स्पर्धकाला बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी काही दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर, घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी म्हणजेच आरटीपीसीआर चाचणी केली जाते आणि या चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्यानंतरच अँटीजेन चाचणी करून बिग बॉस हाऊसमध्ये प्रवेश दिला जातो.

अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अभिजीत बिचुकले याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि त्यामुळे वाइल्ड कार्ड एंट्रीसाठी खूप वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. रश्मी देसाई आणि देवोलिनासोबत अभिजीत बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार होता. पण आता राखी सावंतला घरामध्ये प्रवेश करण्यासाठी निर्मात्यांनी संपर्क साधला आहे आणि राखीने देखील या शोमध्ये सहभागी होण्यासाठी 'हो' म्हटले आहे. अभिजीतला आता त्याच्या प्रवेशाची वाट पाहावी लागणार आहे. शोमध्ये त्याचा समावेश करायचा की नाही याबाबत निर्माते निर्णय घेणार आहेत.

हेही वाचा - भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला प्रभास, आकडा ऐकून जाल चक्रावून

ABOUT THE AUTHOR

...view details