महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाला 'अभया' या नाटकाचा विशेष नाट्यप्रयोग - दिग्दर्शिका मीना नाईक

‘अभया’ या नाटकाचा प्रयोग नुकतेच राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनात पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे नाटक पाहून एवढा महत्वाचा विषय सोप्या पद्धतीने मांडल्याबद्दल संपूर्ण टीमला कौतुकाची थाप दिली.

'अभया' या नाटकाचा विशेष नाट्यप्रयोग

By

Published : Nov 7, 2019, 5:30 PM IST

बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील ‘पोक्सो’ कायद्याबाबत जनजागृती निर्माण करणाऱ्या ‘अभया’ या नाटकाचा प्रयोग नुकताच राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनात पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे नाटक पाहून एवढा महत्वाचा विषय सोप्या पद्धतीने मांडल्याबद्दल संपूर्ण टीमला कौतुकाची थाप दिली.

'अभया' या नाटकाचा विशेष नाट्यप्रयोग

‘अभया’ची प्रमुख भूमिका समर्थपणे पार पाडणाऱ्या चिन्मयी स्वामीचे तसेच लेखिका व दिग्दर्शिका मीना नाईक यांचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले. ‘कळसूत्री’-निर्मित ‘अभया’ या एकल - महिला नाट्याचा ४० वा प्रयोग राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला.

मीना नाईक यांनी यापूर्वी सुद्धा 'वाटेवरती काचा गं' या नाटकाद्वारे कळसूत्री बाहुल्यांच्या मदतीने अतिशय सोप्या शब्दात बाललैंगिक शोषण नक्की कसं थांबवावं याबाबत जनजागृती करण्याच काम केलं होतं. त्यानंतर अभयाद्वारे हाच विषय नव्याने मांडण्याचा प्रयत्न त्यानी केला आहे.

राजभवनात पार पडलेल्या या विशेष नाट्यप्रयोगाला ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता व अभिनेत्री श्रेया बुगडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. अभिनेत्री मनवा नाईक हिने ‘अभया’ नाटकामागची भूमिका स्पष्ट केली. राज्यपालांसोबत या कार्यक्रमाला राजभवनचे कर्मचारी व अधिकारीही आवर्जून उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details