मुंबई- 'आता बस्स' या सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि सिनेमाचं पहिलं गाणं नुकतंच मुंबईत लाँच करण्यात आलं. यावेळी या कार्यक्रमाला आमदार आणि मुंबई बँकचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एका सर्वसामान्य माणसाने समाज बदलण्यासाठी दिलेल्या लढ्याची गोष्ट या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रवीण दरेकरांच्या हस्ते 'आता बस्स' सिनेमाचं पहिलं गाणं अन् पोस्टर लॉन्च - विजय गटलेवार
एका सर्वसामान्य माणसाने समाज बदलण्यासाठी दिलेल्या लढ्याची गोष्ट या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.आमदार आणि मुंबई बँकचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत या सिनेमाचं पहिलं गाणं अन् पोस्टर लॉन्च करण्यात आलं.
अभिनेते मनोज जोशी, अभिनेते सयाजी शिंदे, प्रदीप पटवर्धन, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, पुष्कर श्रोत्री, अभिजित पानसे, विनायक जोशी असे जवळपास 24 कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अशात नुकतंच काही मोजक्या कलाकारांच्या उपस्थितीत या सिनेमाचं पहिलं गाणं अन् पोस्टर लॉन्च करण्यात आलं.
सारेगमप फेम विजय गटलेवार याने या सिनेमाला संगीत दिलं असून बॉलिवूडमधील ख्यातनाम गायक कृष्णा बेवरा यांनी हे गाणं गायलं आहे. विजयने हलाल या सिनेमाला दिलेल्या संगीतासाठी गतवर्षीचा राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार त्याला मिळाला होता. तर दुसरीकडे चक दे इंडिया फेम कृष्णा बेवरा यांनी गायलेलं हे पहिलंच मराठी गाणं असून त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं यावेळी दिग्दर्शक शिरीष राणे यांनी सांगितलं. ए आर एंटरटेनमेंटचे पंडित राठोड आणि निर्मल फिल्मचे संदीप पाटील यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून लवकरच हा सिनेमा रिलीज करण्याचा त्यांचा मानस आहे.