मुंबई - दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा आगामी 'पानीपत' चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अलिकडेच कर्जतमध्ये या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग करण्यात आले. यातील एका भागाचे शूटिंग हे आशा भोसले यांच्या दिग्दर्शनाखाली झाले आहे.
आपल्या मधुर आवाजाने संगीतक्षेत्र गाजवणाऱ्या आशा भोसले यांना आता दिग्दर्शन क्षेत्र खुणावू लागले आहे. गायनाद्वारे आपल्या आवाजाने त्यांनी चाहत्यांवर भूरळ पाडली आहे. 'पानीपत'च्या शूटिंगदरम्यान त्या अचानक सेटवर पोहोचल्या होत्या. त्यांना तिथे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.
चित्रपटाबद्दल संवाद साधताना आशुतोष गोवारीकर यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'आशा भोसलेंनी सेटवर हजेरी लावल्यानंतर सेटवर उत्साही वातावरण निर्माण झाले होते. त्यांचा उत्साह पाहून सर्वांना आनंद झाला होता. एवढंच नाही, तर त्यांनी काही दृश्यांचे दिग्दर्शनही केले. मी एवढं नक्की सांगू शकतो की, आशा भोसले यांची गायनावर ज्याप्रकारे पकड आहे. तशीच दिग्दर्शनामध्येही त्या चपखल आहेत'.
आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत आशा भोसले आशा भोसले यांनी दिग्दर्शित केलेल्या त्या सिनमध्ये पद्मिनी कोल्हापुरे आणि मोहनीश बहेल यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर हा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १७६१ साली झालेल्या 'पानीपत'च्या लढाईवर आधारित आहे. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत आशा भोसले