महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आमिर खानची मुलगी इराने पोस्ट टाकून ट्रोलर्सना दिले आमंत्रण - नेटिझन्सच्या निशाण्यावर इरा खान

आई रीना दत्ता आणि प्रियकर नुपूर शिखरे यांच्याबरोबर सुट्टीचा आनंद घेत असतानाचा एक फोटो इरा खानने पोस्ट केला होता. या फोटोमधील बारीक गोष्टीवर नेटिझन्सची नजर केली आणि तिला ट्रोल करणे सुरू झाले. ती धुम्रपान करते असा संशय घेत तिच्यावर तीव्र शब्तात टीका सुरू झाली आहे.

ira khan trolled
आमिर खानची मुलगी इरा

By

Published : Jul 27, 2021, 7:53 PM IST

मुंबई - आमिर खानची मुलगी इरा खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमुळे स्वतःच ट्रोलर्सना आमंत्रण दिले आहे. इरा सध्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत सुट्टीवर आहे. फोटो शेअरींग साईटवर तिने शेअर केलेल्या फोटोवर नेटिझन्सची घारीची नजर गेली. या फोटोतील बारकावे त्यांनी शोधून काढले. काही जणांनी तिच्या कपड्याबद्दलही आक्षेप घेतला आहे.

इराच्या अलिकडील एका पोस्टमध्ये इरा बाकड्यावर बसलेली असून तिच्या मांडीवर पाळीव श्वान दिसत आहे. गुड मॉर्निंग म्हणत तिने हा फोटो पोस्ट केला पण नेटिझन्सची नजर या फोटोतील इतर गोष्टींवर गेली. तिने बाकड्यावर मोबाईलसह सिगरेटचे पाकिट आणि एक लाइटरही ठेवल्याचा शोध काही जणांना लागला आणि तिला ट्रोल करणे सुरू झाले. काही जणांनी तिने परिधान केलेल्या शॉर्टवरही आक्षेप घेतला आहे. तिला भरपूर सल्ले नेटिझन्स देत आहेत. नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतलेल्या वस्तू चित्रात अस्पष्ट आहेत परंतु इराला ट्रोलिंग करणे सुरुच आहे.

''कोणती सिगरेट ओढतेस?", असा सवाल काहीजणांनी विचारलाय. तर सेलेब्रिटींची मुले योग्य कपडे का परिधान करत नाहीत कारण काय आहे." अशीही विचारणा केली जात आहे.

इरा आणि तिचा प्रियकर नुपूर हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. या जोडप्याबरोबर इराची आई रीना दत्ता देखील आहे.

हेही वाचा - शिल्पाच्या अश्रुंचा बांध फुटला

ABOUT THE AUTHOR

...view details