महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘आई मायेचं कवच’ मालिकेत भार्गवी चिरमुले दिसणार मॉडर्न लूकमध्ये! - bhargavi chirmule in new avtaar

चुकलेल्या मुलीला परत सुखरूप घरी आणण्यासाठी मीनाक्षी जीवाचं रान करते आहे. अनेक पुरावे हाती लागून सुध्दा सुहानी मिळत नाहीये. बर्‍याचदा जवळचा माणूसच संशयित म्हणून समोर येतात त्याक्षणी देखील मीनाक्षी धीर न सोडता त्याला सामोरी जाताना दिसतं आहे.

aai mayecha kavach
‘आई मायेचं कवच

By

Published : Feb 22, 2022, 10:32 PM IST

मुंबई -आई आणि तिचं प्रेम याची तुलना कशाचीही होऊ शकत नाही. सगळं जग एकीकडे आणि आईची माया एकीकडे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणाईला पालकांचं, खासकरून आईचं, प्रेम म्हणजे बंधन वाटते. बहुतेकांना स्वतःचं स्वातंत्र्य अधिक महत्वाचं वाटत असतं. मूल चुकलं तर पुन्हा एकदा मार्गावर आणणारी ही आईच असते. ‘आई मायेचं कवच’ मालिकेत सुहानीसोबत असंच काहीसं घडताना दिसत आहे. जन्मदात्या आईवर विश्वास न ठेवता सुहानीला बाहेरच जग प्रिय होतं. आता सुहानीच्या नकळतच तिच्यावर ओढवलेल्या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी आईचा मात्र कस लागतो आहे.

वाट चुकलेल्या मुलीला परत सुखरूप घरी आणण्यासाठी मीनाक्षी जीवाचं रान करते आहे. अनेक पुरावे हाती लागून सुध्दा सुहानी मिळत नाहीये. बर्‍याचदा जवळचा माणूसच संशयित म्हणून समोर येतात त्याक्षणी देखील मीनाक्षी धीर न सोडता त्याला सामोरी जाताना दिसतं आहे. आता मात्र मालिकेला नवं वळण मिळणार आहे कारण मिनाक्षी सुहानीला शोधण्यासाठी नव्या लूकमध्ये दिसणार आहे. बेपत्ता असलेल्या सुहानीच्या शोधात असताना तिला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आहे. मिनाक्षी चा नवा लूक प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

मालिकेत काय पाहण्यास मिळेल
आता पुरावा काय असेल, सुहानी नक्की कुठे आहे, सत्यापर्यंत ती कशी पोहचणार आणि कसा असेल मीनाक्षीचा पुढचा प्रवास याची उत्तरं मिळतील ‘आई मायेचं कवच’ मालिकेतून. तसेच आता मीनाक्षी सुहानी पर्यंत कशी पोहचेल वा लोखंडे आणि मीनाक्षी मिळून सुहानीला कसे सोडवणार आणि सुहानीपर्यंत पोहोचण्याचा मीनाक्षीला मार्ग सापडणार का या प्रश्नांची उत्तरंही या मालिकेच्या पुढील भागातून मिळणार आहेत.
हेही वाचा -Vasantrao Deshpande Biopic : ‘मी वसंतराव’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्यासमोर!

ABOUT THE AUTHOR

...view details