महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कॉमेडियन वीर दासच्या व्हिडिओने इंटरनेटवर वाद, दिल्ली-मुंबईत तक्रारी दाखल - वीर दासच्या व्हिडिओने इंटरनेटवर वाद

कॉमेडियन वीर दास (Comedian Veer Das)च्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. लोक समर्थन आणि विरोधात प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्याविरोधात दिल्ली आणि मुंबईतील पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

कॉमेडियन वीर दासच्या व्हिडिओने इंटरनेटवर वाद
कॉमेडियन वीर दासच्या व्हिडिओने इंटरनेटवर वाद

By

Published : Nov 17, 2021, 5:22 PM IST

कॉमेडियन वीर दास (Comedian Veer Das)च्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. लोक समर्थन आणि विरोधात प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्याविरोधात दिल्ली आणि मुंबईतील पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. वॉशिंग्टन डीसी (Washington DC) मधील जॉन एफ केनेडी सेंटर (John F. Kennedy Center)मध्ये अमेरिकेतील त्यांचा एक शो पार पडला. त्याच्या या एकपात्री शोचे शीर्षक होते, आय केम फ्रॉम टू इंडियाज (I come from two Indias).

कॉमेडियन वीर दासच्या व्हायरल व्हिडिओची एक झलक

व्हिडिओमध्ये वीर दासने भारतातील विरोधाभासावर भाष्य केले आहे. हा व्हिडीओ समोर येताच अवघ्या काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांनी लोक दोन गटात विभागले गेले.

या गोष्टी उघडपणे बोलल्याबद्दल अनेक लोक वीर दास यांचे कौतुक करत आहेत, तर अनेक लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप करत आहेत.

आशुतोष दुबे नावाच्या व्यक्तीने वीरदास यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार (Complaint against Veer Das to Mumbai Police) दिली आहे. यामध्ये त्यांनी वीर दास यांनी भारताविरोधात अशोभनीय टिप्पणी केल्याचे म्हटले आहे. त्यांनी अशी विधाने केली आहेत, यावरून भारताची लोकशाही धोक्यात असल्याचे दिसून येते,असेही तक्रारीत म्हटले आहे.

कॉमेडियन वीर दासच्या व्हिडिओने इंटरनेटवर वाद

वीर दास यांच्याविरोधात दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल (Complaint lodged with Delhi Police against Veer Das) करण्यात आली आहे. अमेरिकेत आयोजित एका कार्यक्रमात कॉमेडियनने देशाविरोधात अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप आदित्य झा नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.

नेमके काय म्हणाला कॉमेडियन वीर दास? (What exactly did comedian Veer Das say?)

मी अशा भारतातून आलोय की जिथे छोटी छोटी मुले मास्क घालूनच परस्परांचे हात हातात घेतात आणि मी अशाही भारतातून आलोय जिथे मास्क न घालताच नेते परस्परांना मिठ्या मारतात. जिथे हवेचा निर्देशांक 9000 वर गेलेला असतो आणि तरी छप्परावर झोपून आम्ही लोक तारे न्याहाळत बसतो. अशा भारतातला आहे मी, जिथे दिवसभर आम्ही स्त्रियांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो.

मी अशा भारतातून आलोय, जिथे आम्ही ट्विटरवर बॉलिवूडवरून दिवसभर दणादण वादावादी करतो आणि रात्री थेटरातील अंधारात त्याच बॉलिवूडपायी एकरूप झालो सगळे अशा समाधीत जातो. मी त्या भारतातला आहे जिथे आम्ही लैंगिकतेचा सतत उपहास करतो आणि तरी त्यातच एव्हढे गर्क होतो की शंभर कोटींचा आकडा सहज पार करतो. झगमगत्या स्टुडिओत चकचकीत पोशाख घालून परस्परांना हस्तसुख देणाऱ्या माणसांमुळे अख्खी पत्रकारिताच मरणासन्न झालेल्या भारतातून मी आलोय खरा पण त्याच भारतात हातात एक लॅपटॉप घेऊन रस्त्यारस्त्यावर फिरत काही स्त्रिया सत्याचा जागर करतानाही दिसतात.

मी अशा भारतातून आलोय जिथे हिरव्या युनिफॉर्मवाल्यांबरोबर खेळताना निळ्याशी आम्ही उत्कटतेने समरूप होतो पण हिरवे जिंकले रे की जिंकले की दरवेळी अकस्मात भगवे होतो. मी अशा भारतातला आहे जिथे आमच्या घराच्या उबेत आम्ही इतक्या मोठमोठ्याने हसतो की भिंतींचे अडसर ओलांडून आमचा आवाज तुमच्या कानी येतो. पण मी अशा ही भारतातील आहे जिथे आतून हसण्याचा आवाज येत असल्याने विनोदी कार्यक्रम चालू असलेल्या सभागृहाच्या भिंतींची तोडफोड होते.

मी अशा भारतातून आलोय जिथे म्हातारे पुढारी आपल्या मृत बापजाद्यांबद्दल बोलताना थकत नाहीत आणि तरुण नेते आपल्या जिवंत आईचा पदर सोडता सोडत नाहीत. माझ्या भारतात तिशीखालच्या कार्यरत लोकांची संख्या जगात सर्वाधिक आहे. पण तरी ते सगळे पंचाहत्तरी गाठलेल्या आणि दीडशे वर्षांपूर्वीच्या कल्पना उरीं कवटाळून बसलेल्या नेत्यांचे अनुयायी बनलेले असतात. मी अशा भारतातून आलोय जिथे खुट्ट वाजलं की आमच्या पंतप्रधानांची काळजी वहायला आम्ही सदैव सज्ज असतो. पण पंतप्रधान निधीबद्दल मात्र काही थांगपत्ता आपल्याला कधी लागत नाही. ब्रिटिशांना इथून हाकलून दिलेल्या भारतातला आहे मी आणि तरी आमच्या सरकारला आम्ही आमच्यावर 'राज्य करणारा' पक्ष म्हणतो.

हेही वाचा - Aniket VishwasRao : मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसह तिघांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details