महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

उस्ताद अमजद अली खान यांच्या वाढदिवसाला नातवंडांनी दिली अनोखी भेट - जोहान आणि अबीर

सरोद वादक उस्ताद अमजद अली खान ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या जुळ्या नातवंडांनी अनोखी भेट दिली आहे. जोहान आणि अबीर यांनी 'अवर लव्ह' या ट्रॅकसह संगीत जगतात प्रवेश केला, यावर उस्ताद यांनी त्यांच्या वाढदिवसाला मिळालेली मोठी भेट असल्याचे म्हटले आहे.

Johan and Abir
जोहान आणि अबीर

By

Published : Oct 10, 2020, 7:35 PM IST

नवी दिल्ली- सरोद वादक उस्ताद अमजद अली खान शुक्रवारी ७५ वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची जुळी नातवंडे जोहान आणि अबीर अली बंगश यांनी त्यांना एक अनोखे सरप्राईज दिले. अयान अली बंगशची जुळी मुले जोहान आणि अबीर यांनी 'अवर लव्ह' या ट्रॅकसह संगीत जगतात प्रवेश केला, यावर उस्ताद अमजद अली खान यांनी त्यांच्या वाढदिवसाला मिळालेली मोठी भेट असल्याचे म्हटले आहे.

"अबीर आणि जोहान यांच्याकडून मला आजपर्यंतची सर्वोत्कृष्ट वाढदिवस भेट मिळाली आहे. हे खूप सुखद आश्चर्य होते. मी खूप भावूक झालो आणि ते माझ्यासाठी अशावेळी तोहफा घेऊन आले आहेत, जेव्हा पृथ्वीवर परीक्षेचा काळ सुरू आहे, ही गोष्ट माझ्या ह्रदयाला स्पर्श करुन गेली. त्यांच्या या संगीत प्रवासासाठी तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या, असे सांगून उस्ताद अमजद अली खान म्हणाले,एका कलाकारासाठी शिक्षण कधीच बंद होत नाही. मला वाटते की, मी अजूनही एक विद्यार्थी आहे आणि शिकण्यासाठी बरेच काही आहे."

'अवर लव्ह' हा ट्रॅक या वर्षाच्या सुरूवातीला लॉकडाऊनच्या काळात प्रोड्युस झाला होता. राग तिलक कामोदवर आधारित कंपोझिशनमध्ये या जुळ्या मुलांनी सादरीकरण केले. अयानने 'अवर लव्ह' करण्यामागील हेतू शेअर केला.

ते म्हणाले, "जेव्हा या पृथ्वीवरील परीक्षेची वेळ संपेल आणि मानवजात साथीच्या आजारातून सावरेल, तेव्हा माझ्या मुलांसोबत आणखी संगीत रचना बनवण्याचा प्रयत्न करेन, जसे मी आणि माझ्या भावाने त्यांच्याच वयात केले होते. खरंतर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे संगीत ग्रहण केले आहे आणि त्यांना स्टेजवर परफॉर्म करताना पाहणे अभिमानाचे असेल.''

ABOUT THE AUTHOR

...view details