टेलिव्हिजनवरील मालिका विश्वामध्ये कडूगोड आठवणींनी भरलेले भाग पाहून प्रेक्षक सुखावतात. संकटं झेलल्याशिवाय यश मिळत नाही आणि यश मिळविण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात ही शिकवण त्यांना नक्कीच मिळत असेल. ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकाही प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच उत्तम वर्तणुकीचे धडे देत असते. या मालिकेत भलेही राजा रानीवर संकटं ओढवली असतील परंतु ते नेटाने त्याचा मुकाबला करताना दिसताहेत आणि ते प्रेक्षकांना आवडतही आहे.
संजू आणि रणजीत एकमेकांच्या साथीने मोठयातलं मोठं संकट दूर करतात. ‘राजा व रानी’ या दोघांनी मिळून त्यांच्यावर आलेलं अरिष्ट परतवून लावले आहे. पुन्हा एकदा वाईटावर चांगल्याचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाही. रणजीतच्या मार्गदर्शनामुळे संजूने खर्या गुन्हेगारांचा शोध लावला आणि गुलाबचा डाव मोडीत काढला आहे. संजूची जिद्द आणि प्रयत्नामुळे रणजीतची निर्दोष सुटका होणार आहे. गुलाब रणजीतला जी कठोर शिक्षा देण्याचा बेत आखत होती तो आता संजूमुळे पूर्ण होऊ शकणार आहे.