देव सर्वच घरात उपस्थित राहू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात ‘आई’ दिली. आई आणि आईचं प्रेम हे काही वेगळ्या शब्दांमध्ये मांडायला नको. सगळं जग एकीकडे आणि आईची माया एकीकडे. आपल्या लेकारावर जर कोणी निस्वार्थपणे माया करत असेल तर ती आईचं. हल्लीची तरुणाई भावनाप्रधानतेला फारसं महत्व देत नाही. पाश्चिमात्य देशांची नक्कल करता करता त्याच्यातली माणुसकी तर हरवून जाणार नाही ना हा प्रश्न पालकांना सतावतोय. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला हे प्रेम कळत नाही किंवा कळून देखील आपण न कळल्याचा आव आणत असतो. कारण, आपल्याला आपलं स्वातंत्र्य त्यापुढे अधिक महत्वाचं वाटत असतं.
मूल चुकलं तर पुन्हा एकदा मार्गावर आणणारी ही आईच असते. ‘आई मायेचं कवच’ मालिकेत सुहानीसोबत असंच काहीसं घडताना दिसत आहे. जन्मदात्या आईवर विश्वास न ठेवता सुहानीला बाहेरच जग प्रिय होतं. आता सुहानीच्या नकळतच तिच्यावर ओढवलेल्या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी आईचा मात्र कस लागतो आहे. वाट चुकलेल्या मुलीला परत सुखरूप घरी आणण्यासाठी मीनाक्षी जीवाचं रान करते आहे. अनेक पुरावे हाती लागून सुध्दा सुहानी मिळत नाहीये. बर्याचदा जवळचा माणूसच संशयित म्हणून समोर येतात त्याक्षणी देखील मीनाक्षी धीर न सोडता त्याला सामोरी जाताना दिसतं आहे.
हेही वाचा -'गंगूबाई काठियावाडी'तील नेत्रदीपक 'ढोलिडा' गाणे रिलीज