मनोरंजनाच्या जगतात वेब सिरीज हा पर्याय तरुणाईत खूपच लोकप्रिय आहे. अमॅझॉन प्राईम या डिजीटल प्लॅटफॉर्मवर नव्या १४ वेब सिरीजची घोषणा झाली आहे. यात नव्या कोऱ्या ९ मालिका असून गाजलेल्या मालिकांचे पुढील सिझनही येत आहेत. नव्या वर्षात प्रेक्षकांनी ही नवी पर्वणी पाहाता येणार आहे.
'मिर्झापूर', 'इनसाईड एज', 'ब्रेथ'च्या नव्या सिझनसह १४ वेब मालिकांची घोषणा - Mirzapur season 2
अमॅझॉन प्राईम या डिजीटल प्लॅटफॉर्मवर नव्या १४ वेब सिरीजची घोषणा झाली आहे. यात नव्या कोऱ्या ९ मालिका असून गाजलेल्या मालिकांचे पुढील सिझनही येत आहेत.
१४ वेब मालिकांची घोषणा
कबीर खान दिग्दर्शित द फर्गॉटन आर्मी, आनंद तिवारी दिग्दर्शित बंदिश बँडिट्स, निखिल अडवाणी दिग्दर्शित मुंबई डायरीज २६/११, अली अब्बास जफर दिग्दर्शित डील्ली या मालिकांसह पाताल लोक, द लास्ट हावर, गोरमिंट या वेब मालिकांचा समावेश आहे.
अमॅझॉन प्राईमवर पूर्वी खूप गाजलेल्या वेब मालिकाचे पुढील सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आणले जाणार आहेत. यात मिर्झापूर २, इनसाईड एज ३, ब्रेथ २, फोर मोअर शॉट्स २, द फॅमिली मॅन २ या वेब मालिकांचा समावेश आहे.