मुंबई- सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्यात या कार्यक्रमातील काही कलाकारांना कोरोना झाला असल्याचं निष्पन्न झालं असलं तरीही त्यापूर्वीच या कार्यक्रमाचे बरेचसे शुटिंग पूर्ण झालेलं असल्याने प्रक्षेपणावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.
येत्या आठवड्यात फर्माईशी विशेष भाग असून स्पर्धकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांकडून गाण्यांच्या फर्माइशी आल्या आहेत. स्पर्धक ती गाणी या विशेष भागात सादर करणार आहेत.