महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत अभिमन्यूच्या तोंडाला फासलं काळं, कुणी आणि का?

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेमध्ये अभिमन्यू आणि लतिकाच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्याचं काही नावं घेत नाहीये. अनेक संकटांना सामोरे जाणाऱ्या अभिमन्यूच्या तोंडाला काळ फासण्याचा प्रकार घडणार आहे. अशा प्रकारे ही मालिका उत्सकता वाढवत आहे.

'Sundara Mana Mein Bharli'
'सुंदरा मनामध्ये भरली'

By

Published : Aug 5, 2021, 6:57 PM IST

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमधील लतिका आणि अभिमन्यूची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे ही मालिका दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होतेय. स्ट्रॉबेरी पिक्चर्सच्या बॅनरखाली मनवा नाईकने निर्मित केलेली ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचे यश तिने आपल्या मेहनती टीमला दिले आहे. या मालिकेमधील अक्षया नाईक व समीर परांजपे यांची जोडी प्रेक्षकांना भावतेय. मालिकेत लतिका आणि अभिमन्यू या दोघांच्या सुखदु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली'

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेमध्ये अभिमन्यू आणि लतिकाच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्याचं काही नावं घेत नाहीये. दोन कुटुंबात वाढत असलेल्या कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे. बापूंना सत्य कळताच त्यांनी त्या दिवसापासून मुलीच्या प्रेमापोटी खोट्या संसारतून तिला बाहेर काढलं. या सगळ्याची अभिमन्यूला याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागते आहे. अभिमन्यूवर संकट ओढवलेले असल्यामुळे पुढे नक्की काय होणार हे बघणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असणार आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली'

त्याचप्रमाणे मालिकेत लतिकाच्या कर्तृत्वाबद्दल तिचा मोठा सत्कार होणार आहे. आणि हा सत्कार अभिमन्यूच्या हस्ते पार पडणार आहे. पण, जमा झालेल्या बायकांनी अभिमन्यूविरुध्द आवाज उठवला असून त्याच्या तोंडाला काळं फासण्यासाठी पुढे येतात. एकीकडे लतिकाचा होणार सत्कार आणि दुसरीकडे अभिमन्यूविरुध्द उठलेला आवाज, यातून निर्माण होणारं नाट्य मालिकेतून दिसणार आहे. परंतु लतिका अभिमन्यूचा होणारा अपमान कसा थांबवणार हेही प्रेक्षकांना बघायला मिळेल.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित होते.

हेही वाचा - प्लॅनेट मराठी ओटीटी' वर उपलब्ध होणार मराठी मनोरंजनाचा खजिना!

ABOUT THE AUTHOR

...view details