महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिग बॉस मराठी सिझन तिसरामध्ये रहिवाश्यांचे रुसवे फुगवे!

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खूप घडामोडी घडताना दिसत आहे. गप्पा, गॉसिपींग, वाद, मस्करी यांची रेलचेल सुरू असते. आता यात स्पर्धकांच्या रुसव्या फुगव्याची भर पडत आहे.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा
बिग बॉस मराठी सिझन तिसरा

By

Published : Oct 13, 2021, 10:57 PM IST

आदिश वैद्यच्या पॉवरकार्डची किंमत घरातील तीन सदस्यांना मोजावी लागत आहे. दादूस, मीनल आणि जय हे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घराचे पहारेकरी असणार आहेत. यावरून जय आणि आदेशमध्ये खूप मोठा राडा झाला. जय गायत्रीला बोलला, “एक खरं बोलू का गायत्री, आवडतं मला तुझं ॲटीट्युड”. गायत्री म्हणाली, “माझ्या फ्रेंडला कोणी काही बोललं तर मी तोंडावर बोलणार.’ उत्कर्ष म्हणाला, “तो कॉमेडी” आहे, कसा चालतो तो बघितलं का?” यावर गायत्रीने तो कसा चालतो याची नक्कल करून दाखविली.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा

नवीन टास्कमध्ये सदस्यांची जीपमध्ये बसण्यासाठी धावपळ सुरू आहे आणि जीपमध्ये बसले आहेत गायत्री, उत्कर्ष, स्नेहा, जय आणि मीरा. स्नेहा आणि आदिशमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. आदिशची एंट्री झाल्यापासून तो प्रत्येक सदस्याशी हुज्जत घालताना दिसत आहे असे स्नेहाचे आणि इतर सदस्यांचे मत आहे. बिग बॉसने दिलेल्या कार्यामुळे आदिशबद्दल जय, उत्कर्ष आणि त्यांच्या ग्रुपमध्ये नकारात्मक भावना आहे जी वेळोवेळी दिसून आली आहे. आदिश आणि जय नंतर आता स्नेहा आणि आदिशमध्ये देखील वाद झाला.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा

टास्कच्या मध्ये टीममधील चर्चेदरम्यान सुरेखा कुडची थोड्या नाराज झाल्या. सुरेखानी टीमला विचारले, “तुमचं काय ठरतयं मग. कसं करायचं”. यावर मीनल म्हणाली, “जेव्हा बजर वाजेल तेव्हा आपण निर्णय घेऊ काय करायचे.’ उत्कर्ष प्रत्येकाला वेगवेगळी कहाणी सांगतो आहे. त्यावर तृप्तीताई म्हणाल्या, “पण आता तर ते म्हणाले की त्यांनी विकासला सांगितलंय की सुरेखाताईंना पाठवा”. त्यावर विकास म्हणाला “दादूस आमचं ठरलेलं आहे”. बहुमताने आविष्कार दारव्हेकरच नाव पुढे आल्यामुळे सुरेखा नाराज होत म्हणाल्या “मला माहिती होतं हे होणारेय म्हणून....”

बिग बॉस मराठी सिझन तिसरा

बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

हेही वाचा - कार्तिक आर्ननने सचिन तेंडूलकरची मुलगी साराच्या फोटोवर दिली प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details