वॉशिंग पावडरच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार अडचणीत, तक्रार दाखल - complaint against actor Akshay Kumar
वरळी पोलीस ठाण्यात अक्षयकुमारच्या विरोधात शिवप्रेमींकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अक्षय कुमार
मुंबई -अभिनेता अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. वरळी पोलीस ठाण्यात अक्षयकुमारच्या विरोधात शिवप्रेमींकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. अक्षयकुमार याने 'निरमा' पावडरच्या जाहिरातीमधून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा अपमान केला असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.