मुंबई - दूरदर्शनवर रामायण, महाभारत, सर्कस आणि ब्योमकेश बक्षी यासारख्या गाजलेल्या जुन्या मालिकांसोबतच आता ९० च्या दशकात बच्चे कंपनीमध्ये खूप लोकप्रिय ठरलेली मालिका शक्तिमान दाखवण्याची घोषणा झाली आहे. या मालिकेत शक्तिमानची भूमिका साकारणऱ्या अभिनेता मुकेश खन्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तो शक्तिमान पुन्हा सुरू होत असल्याची आनंदाची बातमी देताना दिसत आहे.
दूरदर्शनवर परतला ९० च्या दशकातील बच्चे कंपनीचा सुपरहिरो शक्तिमान - Mukesh Khanna latest news
सध्या कोरोना व्हायरसमुळे देश लॉकडाऊन असताना लोकांनी घरीत थांबावे असे आवाहन पंतप्रधानांनी केलंय. लोकांसाठी रामायण, महाभारत, सर्कस आणि ब्योमकेश बक्षी यासारख्या गाजलेल्या जुन्या मालिका दूरदर्शनवर दाखवल्या जाणार आहेत. आता ९० च्या दशकात बच्चे कंपनीमध्ये खूप लोकप्रिय ठरलेली मालिका शक्तिमान दाखवण्याची घोषणा झाली आहे.
![दूरदर्शनवर परतला ९० च्या दशकातील बच्चे कंपनीचा सुपरहिरो शक्तिमान Shaktiman back on doordarshan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6596127-thumbnail-3x2-raj.jpg)
शक्तिमान ही दूरदर्शन मालिका प्रथम १३ सप्टेंबर १९९७ रोजी प्रसारित करण्यात आली होती. मुकेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका साकारली होती. शक्तिमान हे भारतीय दूरचित्रवाहिनीला "सुपरमॅन"वरून प्रेरणा घेतलेले पहिले पात्र समजले जाते. शक्तिमान हा दिवसा सर्व लोकांत गुप्त प्रकारे "पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शात्री" या नावाने पत्रकाराच्या भूमिकेत वावरत असतो.
आजच्या काळात लहानमुळे अनेक सुपरहिरोंच्या मालिका, सिनेमा पाहात असतात. तांत्रीकदृष्ट्या सध्या टीव्ही विश्व प्रगत झाले आहे. हॉलिवूडच्या अनेक सुपरहिरोंनी बच्चे कंपनीला वेड लावलंय. त्यात सुपरमॅन, बॅटमॅन, हॅरी पॉर्टर अशी अनेक पात्रे लोकप्रिय ठरलेत. अशावेळी ९० च्या दशकात सामान्य तंत्र वापरण्यात आलेला शक्तिमान आजच्या बच्चे कंपनीला आवडतो की नाही हे येणारा काळच ठरवेल.