ज्या मालिकेतून शिवा आणि सिद्धीचं प्रेम धगधगत्या निखाऱ्यांतून फुललं त्या ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेने एपिसोड्सचं पंचशतक गाठलंय. खरंतर या मालिकेने जेव्हा ५०० भागांचा पल्ला गाठला त्याच सुमारास या मराठी मालिकेवर बेतलेली हिंदी मालिका ‘बावरा दिल’ हीसुद्धा सुरु झाली आहे. यावेळेस मालिकेच्या टीमने ‘५०० भागांचं जिवापाड नातं जुळलं, शिवा-सिद्धीच प्रेम धगधगत्या निखार्यातून फुललं’ ही टॅगलाईन प्रसारित केली.
‘जीव झाला येडापिसा’चे पंचशतक ५०० भागांच्या पूर्णत्वाने मनोरंजनाचा जपला वसा, रसिक प्रेक्षकांच्या मिळणार्या या उदंड प्रतिसादाने “जीव झाला येडापिसा” असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा ‘जीव झाला येडापिसा’ मालिका सुरू झाली तेव्हा यावर संपूर्ण महाराष्ट्राचा जीव जडला. मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली. द्वेषातून सुरू झालेलं शिवा सिध्दीचे नाते प्रेमाने बहरलं आणि कठीण परिस्थितीला सामोरे जात या दोघांनी खंबीरपणे, मोठ्या धीराने तोंड दिले. तसेच अनेक आव्हानं, कसोट्या पार केल्यानंतर आता प्रेक्षकांची डार्लिंग सिध्दी आणि रांगडा शिवादादा यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आले आहेत.
‘जीव झाला येडापिसा’चे पंचशतक आता लष्करेंच्या घरात सिद्धीने ती आई होणार अशी गोड बातमी दिली. सगळे गैरसमज, भांडणं सरून आता दोघांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. मंगलने सिद्धिचा नेहेमीच दुस्वास केला पण तरीही सिद्धीने त्यांना माया आणि सन्मान दिला. या सगळ्यात काकी, सोनी, यशवंत यांची साथ सिध्दी व शिवाला कायमच मिळत आली आहे. सिध्दीने ही गोड बातमीच देताच दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.
‘जीव झाला येडापिसा’चे पंचशतक नुकताच ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेने गाठला ५०० भागांचा गाठला पल्ला आहे आणि प्रेक्षकांच्या मिळणार्या भरघोस प्रतिसादामुळेच हे शक्य झाले असे मालिकेची संपूर्ण टीम मानते. हा दिवस संपूर्ण टीमने मोठ्या उत्साहात साजरा केला, सेटवर मज्जा मस्ती केली, फोटो काढले, केक कापला आणि स्नेहभोजनही केले.
‘जीव झाला येडापिसा’चे पंचशतक ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित होते.