महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘वक्त को नचायेंगे, डान्स मचायेंगे’ म्हणत तीन पिढ्यांमधील ‘डान्स दिवाने’ आहेत तयार स्पर्धेसाठी! - 'Dance Diwane' on Colors channel

कलर्स वाहिनी लोकप्रिय डान्स रियालिटी शो ‘डान्स दिवाने’ चा ३रा सिझन घेऊन येत आहे, ‘वक्त को नचायेंगे, डान्स मचायेंगे’ ही टॅग-लाईन घेऊन. नव्या दमाच्या ऊर्जेसह, तिन्ही पिढ्यातील स्पर्धक पुन्हा एकदा त्यांच्या ऊर्जेने डान्स पुन्हा करणार आहेत.

dance-diwane
डान्स दिवाने

By

Published : Feb 19, 2021, 5:43 PM IST

छोट्या पडद्यावरील रियालिटी शोज प्रेक्षकांचा पाठिंबा मिळवीत आहेत. त्यामुळे लोकप्रिय रियालिटी शोज दरवर्षी नवीन सिझन घेऊन येत असतात. कलर्स वाहिनी लोकप्रिय डान्स रियालिटी शो ‘डान्स दिवाने’ चा ३रा सिझन घेऊन येत आहे, ‘वक्त को नचायेंगे, डान्स मचायेंगे’ ही टॅग-लाईन घेऊन. नव्या दमाच्या ऊर्जेसह, तिन्ही पिढ्यातील स्पर्धक पुन्हा एकदा त्यांच्या ऊर्जेने डान्स पुन्हा करणार आहेत. भारताची ‘धक धक गर्ल’ देखणी आणि आकर्षक माधुरी दीक्षित या शोची जज असून तिच्यासोबत दोन अप्रतिम कोरियोग्राफर्स आणि डान्सर्स, तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे, सुद्धा परीक्षण करणार आहेत. आपल्या ‘स्लो मोशन डान्स’ आणि विनोदी ‘वन लाइनर्स’ ने प्रेक्षकांनाचे अफाट मनोरंजन करणारा राघव जुयाल नव्या सीझनचा होस्ट असणार आहे.

डान्स ही अभिव्यक्ती करण्याची जागतिक भाषा आहे, या कलेला वयाचे बंधन नाही. निवडक स्पर्धकांच्या संयोगाने उल्लेखनीय ठरलेला डान्स दीवाने पुन्हा एकदा लायक व्यक्तींना त्यांचे टॅलेंट दाखविण्याची आणि पुढे येण्याची जीवनभराची संधी देणार आहे. तीन पिढ्यांमधील स्पर्धकांना एका मंचावर एकत्र आणत डान्स साजरा करत आहे कलर्सचा नामवंत डान्स रिॲलिटी शो ‘डान्स दिवाने’. मग त्यात नवरा-बायकोची जोडी शिल्पा आणि अजय तिसऱ्या पिढीतील असतील, ज्यांनी त्यांच्या सूक्ष्म बारकाव्यांनी सर्वांना प्रभावित केले होते, नागपूरचे पियुष गुरभेले हे दुसऱ्या पिढीतील असतील ज्यांनी निर्भयपणे उर्जेने भरलेले कार्यक्रम केले होते, पहिल्या पिढीतील गुंजन आणि सोहेल असतील जे स्फोटक नृत्यासाठी ओळखले जातात, मध्य प्रदेशातील उदयसिंग आणि रांचीमधील अमन कुमार राज डान्स मंचाचा ताबा घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. इंटरनेटवर अमनचा व्हिडिओ आला आणि त्यातील त्याच्या उर्जेने माधुरी दीक्षित इतकी प्रभावित झाली की तिने त्याला शोवर आमंत्रित केले. प्रथमच शो मध्ये परीक्षकांच्या पॅनेल मध्ये व होस्ट सर्व डान्सर आहेत आणि ते स्पर्धकांचे मार्गदर्शक आहेत व मार्गदर्शन करणार आहेत. ते नव्या आव्हानांना भिडतील आणि त्यांच्या डान्सच्या सर्वोत्तम मूव्ह्स दाखवतील, तेव्हा प्ले, पॉज आणि रिवाइंड घटक स्पर्धेतील त्यांचे भविष्य ठरवणार आहेत.

शोच्या संकल्पनेविषयी बोलताना, वायकॉम 18 च्या हिंदी मास एंटरटेनमेंट व किडस टिव्ही नेटवर्कच्या प्रमुख नीना इलेव्हिया जयपुरिया म्हणाल्या, “बिग बॉसच्या यशस्वी सीझन नंतर, आम्ही आमच्या मातीतील डान्स रिॲलिटी शो, डान्स दिवाने, पुन्हा सुरू करण्यासाठी उत्सुक आहोत. नव्या सीझनच्या प्रारंभातून, नवे शोध, तीन पिढ्यांना एकत्र आणणे आणि साचेबध्दता मोडणे यात सातत्य राखल्याचा आम्हाला आनंद होत आहे.” शोच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरुपाविषयी बोलताना, वायकॉम 18च्या हिंदी मास एंटरटेनमेंटच्या चीफ कंटेंट ऑफिसर, मनीषा शर्मा म्हणाल्या, “डान्स दिवानेमध्ये फक्त डान्स साजरा केला जात नाही तर तीन विविध पिढ्यांच्या सादरीकरणातील आवडीला सुध्दा सलाम केला जातो. माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांना परीक्षकांच्या पॅनेल वर पुन्हा परत पाहताना आम्हाला आनंद होत आहे. तसेच धर्मेश येलांडे सुध्दा त्यांच्यात सामील होत आहे आणि अतिशय हुशार राघव जुयाल होस्ट म्हणून वारसा पुढे नेत आहे. नव्या दमाच्या उर्जेने आणि वक्त को नचायेंगे, डान्स मचायेंगे या विचारासह, आम्ही या नव्या प्रवासाकडे पाहात आहोत.”

परीक्षक म्हणून पुन्हा येण्यासाठी आनंदित झालेल्या माधुरी दीक्षित म्हणाली, “प्रत्येक वर्षी जेव्हा मी डान्स दिवानेच्या मंचावर येते, तेव्हा अतुलनीय उत्सुकता असते. डान्स आणि डान्स दिवाने मला खूप जवळचे आहेत आणि एका मंचावर अशा प्रकारचे विविध टॅलेंटिंग स्पर्धक पाहणे नेहमीच प्रेरणादायी असते. जर मला अशा प्रकारचे अविश्वसनीय कलाकार पहायचे असतील, तर मी सुध्दा त्यांना त्यांच्या प्रवासात मार्गदर्शन केले पाहिजे.”

‘वक्त को नचायेंगे, डान्स मचायेंगे’ अशी टॅग-लाईन असलेला ‘डान्स दिवाने’ कलर्स वाहिनीवर सुरू होत आहे २७ फेब्रुवारी पासून.

ABOUT THE AUTHOR

...view details