मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने अभिनेता ऋषी कपूर आणि कोरियोग्राफर सरोज खान यांचे स्मरण केले. या दिग्गजांसोबत तिने 1995मध्ये ‘याराना’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील 'मेरा पिया घर आया' हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले होते.
‘याराना’ चित्रपटाची २५ वर्षे : माधुरीने केले ऋषी कपूर आणि सरोज खान यांचे स्मरण - Madhuri Dixit
याराना या २५ वर्षापूर्वी आलेल्या चित्रपटात माधुरी दीक्षितने ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटातील 'मेरा पिया घर आया' हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले होते. या दोन्ही दिग्गजांचे स्मरण माधुरीने केले आहे.
‘याराना’ चित्रपटाची २५ वर्षे
माधुरी दीक्षितने ट्विटरवर चित्रपटाशी संबंधित काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती नृत्यदिग्दर्शक सरोज खान आणि अभिनेता ऋषी कपूरसोबत दिसली आहे.
माधुरीने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''ऋषीजींसोबत काम करणे आणि 'मेरा पिया घर आया' या गाण्याचे डान्सिंग स्टेप्स शिकणे सर्वात संस्मरणिय क्षण होते. ‘याराना’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने या दिग्गजांची आठवण करीत आहे आणि त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करते.''