सोलापूर - शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आयोजन हे रिव्हर्स इंटिग्रेशन अशा स्वरूपात राहणार असून राज्यातील प्रमुख १३ शहरात हे संमेलन साजरे होणार आहे. ही माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी अभिनेते शरद पोंक्षे, सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह ज्योतिबा काटे,उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची यांच्यासह प्रमुख नाट्यकलावंत उपस्थित होते.
आजपर्यंत नाट्यकलावंत ग्रामीण भागातून येऊन शहरी थिएटर्समध्ये आपली कला सादर करतात. मात्र, यावेळी शहरी कलावंत जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन आपली कला सादर करणार आहेत. त्याची सुरुवात २७ मार्चला सांगली येथे नाट्यसंमेलनाच्या उदघाटनाने होणार आहे. त्यानंतर २० ते २३ मार्चला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, आणि बार्शी या छोट्या शहरात नाट्य जागर आणि २४ ते २६ एप्रिल दरम्यान सोलापूरात हे संमेलन होणार आहे. त्यानंतर लातूर येथे पुढचे संमेलन होणार आहे. या नाट्य संमेलन पहिला टप्पा महाराष्ट्रात पार पडणार आहे. तर, दुसरा टप्पा भारतात पार पडेल.