महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भक्तिमय मनोरंजनाची शंभरी, 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी'! - 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' फक्त मराठीवर

‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' च्या तिसऱ्या पर्वाने नुकतीच शंभरी पार केली आहे. या मालिकेचे दररोज सकाळी 'फक्त मराठी वाहिनी'वर प्रसारण होते. आजपर्यंत या कार्यक्रमात महाराष्ट्रातील संतपरंपरा, महाराष्ट्र संस्कृती, सण - उत्सव, स्त्री भ्रूण हत्या, वृक्षारोपण अशा विविध विषयांना या कार्यक्रमात विशेष महत्व देण्यात आले आहे.

'Devachiye Dwari Kirtanachi Wari'
'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी'

By

Published : Apr 3, 2021, 12:36 PM IST

महाराष्ट्रात अनेक थोर संत महात्म्यानी शेकडो वर्षांपासून कीर्तनाचा आधार घेऊन समाज प्रबोधंनातून परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांनी या कलेचा खुबीने वापर करीत समाजाला साक्षर करण्याचे काम केले आहे. आजच्या प्रगत युगात हे काम प्रसार माध्यमांच्या हाती आहे. मनोरंजनासोबतच समाज प्रबोधनाला प्राधान्य देत ‘फक्त मराठी वाहिनी’ने सातत्याने नव्यानव्या कथा कल्पनांसाठी आपलं व्यासपीठ खुलं केलेलं आहे. वेगळ्या पद्धतीचा सामाजिक कार्यक्रम ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' च्या तिसऱ्या पर्वाने नुकतीच शंभरी पार केली आहे. या मालिकेचे दररोज सकाळी 'फक्त मराठी वाहिनी'वर प्रसारण होते.

आजपर्यंत या कार्यक्रमात महाराष्ट्रातील संतपरंपरा, महाराष्ट्र संस्कृती, सण - उत्सव, स्त्री भ्रूण हत्या, वृक्षारोपण अशा विविध विषयांना या कार्यक्रमात विशेष महत्व देण्यात आले आहे. पुढेही या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण होणार असून महाराष्ट्रातील अभिजात संत साहित्य, मौखिक, अध्यात्मिक कलागुणांनी संपन्न अश्या दिग्गज कीर्तनकारांचा सहभाग आणि त्यांचे बहारदार सादरीकरण यामुळे प्रेक्षकांचे सखोल ज्ञानार्जनही होणार आहे. दिग्गज कीर्तनकारांची मधुर वाणी, साधी सोप्पी बोलीभाषा यामुळे प्रेक्षक 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' सोबत एकरूप होतात.

संत साहित्य, पुराण कथा, इतिहासातील दाखले देत कीर्तनकार महाराष्ट्रातील घटना, परंपरा ओघवत्या खुमासदार शैलीत हा कार्यक्रम कथन करीत प्रेक्षकांचे उत्तम भक्तिमय मनोरंजनही करतो. “महाराष्ट्राची संत परंपरा खूप मोठी आहे आणि ती परंपरा जपणं आणि ती नवीन पिढी पर्यंत पोहोचवणं हा उद्देश ठेऊन ह्या कार्यक्रमाला सुरवात केली आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे” असं फक्त मराठी वाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी निर्माता संकेत पावसे यांनी सांगितलं.

'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' या कार्यक्रमामध्ये अध्यात्मासोबत आपल्या आसपास घडणाऱ्या विविध ज्वलंत विषयांवर भाष्य करीत प्रेक्षकांचे साध्या सोप्या उदाहरणांद्वारे मनोरंजन केले जाते. महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार त्यांच्या ओघवत्या शैलीत हे कीर्तन सादर करून प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवत त्यांच्या डोळ्यात अंजन घालीत समाज जागृत करण्याचे महत्वाचे कार्य करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

या कार्यक्रमाचं दिग्दर्शन मंगेश खरात यांचे असून निर्मिती राजू पी. दियलानी यांच्या ‘न्यू टीआरपी’ या संस्थेची असून ‘न्यू टीआरपी’ साठी प्रोजेक्ट हेड निलेश पटवर्धन आहेत. महाराष्ट्राच्या संत साहित्य, परंपरा त्यातील वैविध्यता यासोबतच दिग्गज कीर्तनकारांच्या सादरीकरण करणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे करीत आहे.

हेही वाचा - करण जोहरने केले 'अजिबा दास्तां' चित्रपाटाच्या ट्रेलरचे अनावरण

ABOUT THE AUTHOR

...view details