महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वाणी कपूर अन् आयुष्मान खुराना 'या' आगामी सिनेमात एकत्र दिसणार - निर्माता अभिषेक कपूर

‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे वाणी कपूर आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांची जोडी चित्रपट निर्माता अभिषेक कपूरच्या पुढच्या चित्रपटात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आयुष्मान-वाणी
आयुष्मान-वाणी

By

Published : Aug 7, 2020, 10:00 AM IST

मुंबई -‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे वाणी कपूर आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांची जोडी चित्रपट निर्माता अभिषेक कपूरच्या पुढच्या चित्रपटात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, चित्रपटाच्या टीमच्या मनात काही अन्य अभिनेत्रीची नावे आहेत. पण अभिषेकला विश्वास आहे की, वाणी उत्कृष्ट भूमिका साकारेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आयुष्मान-वाणीच्या या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ऑगस्ट 2021 ला थिएटरमध्ये रिलीज होऊ शकतो. या चित्रपटामध्ये आयुष्मान 'क्रॉस-फंक्शनल एथलीट' च्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. केदारनाथ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यासोबत आयुष्मान पहिल्यांदाच काम करत आहे. चित्रपटाचे नाव काय असेल, याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, ‘शुद्ध देसी रोमान्स’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी वाणी कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते. ‘शुद्ध देसी रोमान्स’नंतर ती ‘वॉर’ आणि ‘बेफिक्रे’ या चित्रपटातही झळकली आहे, तर आयुष्मान 'ड्रीम गर्ल', 'गुलाबो सिताबो' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटांमधून झळकला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details