अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा आगामी 'लव्ह आज कल' सिनेमा बराच चर्चेत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रिलीज होत असलेल्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. दरम्यान तिचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.
हा व्हिडिओ आहे तोंडाला पाणी सोडणारा. अनेक खाद्य पंदार्थांवर सारा ताव मारताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत ती शायरीच्या मुडमध्ये दिसते.
तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तोंडाला पाणी सुटेल अशी मिठाई दिसते. सोबतच तिने छोले भठूरे तयार ठेवण्याचा सल्लाही फोटोच्या कॅप्शनमध्ये दिलाय.
'लव्ह आज कल' या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि कार्तिक पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे त्यांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री पाहण्यासाठी चाहते देखील आतूर आहेत.
इम्तियाज अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री आरुषी शर्माचीही यामध्ये मुख्य भूमिका आहे. दोन काळातील प्रेमकथेवर आधारित असलेला हा चित्रपट सिनेमागृहात काय कमाल दाखवतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.