मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सतत नवीन खुलासे होत आहेत. आत्महत्येच्या आदल्या रात्री म्हणजे 13 जूनला, सुशांतच्या घरी कोणतीही पार्टी झाली नव्हती, असे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सोमवारी सांगितले. तपास योग्य दिशेने सुरु असून बिहार पोलिसांनी ही केस आमच्याकडे ट्रान्सफर करायला हवी होती, असेही सिंह म्हणाले.
सुशांतच्या आत्महत्येपूर्वी घरात पार्टी झाली नाही, मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली माहिती - अभिनेता सुशांत सिंग राजपूत
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सतत नवीन खुलासे होत आहेत. आत्महत्येच्या आदल्या रात्री म्हणजे 13 जूनला, सुशांतच्या घरी कोणतीही पार्टी झाली नव्हती, असे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सोमवारी सांगितले.
सुशांतच्या बँक खात्यांतील आर्थिक व्यवहाराचा तपशील तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्य, मित्र, डॉक्टर, सर्व कोनातून मुंबई पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत, असे सिंह यांनी सांगितले.
भाजपचे आमदार राम कदम व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरकारवर सुशांतच्या मृत्यू प्रकरणी हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र सरकार मुंबई पोलिसांना काम करू देत नाही, असेही ते म्हणाले. सुशांतच्या घरी आत्महत्येच्या आदल्या रात्री पार्टी झाली होती का? त्यात कोण उपस्थित होते? त्याने सीमकार्ड का बदलली होती, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केले आहेत.