महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'झोंबिवली' प्रदर्शित होणार ‘या’ तारखेला! - अमेय वाघ

मराठीमध्ये प्रथमच ‘झोंबीज’ जॉनर चा हॉरर चित्रपट बनलाय, ‘झोंबिवली’ (Zombivli). लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. परंतु आता तो लवकरच सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी असंही म्हणता येईल की, येत्या ४ फेब्रुवारी रोजी ‘झोंबिवली’तील लॉकडाउन उठवण्यात येत आहे.

Amey Wagh and Lalit Prabhakar's zombie comedy Zombivli to be released on 4 February
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'झोंबिवली' प्रदर्शित होणार ‘या’ तारखेला!

By

Published : Nov 14, 2021, 6:40 AM IST

मुंबई - महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुन्हा उघडण्यात आल्यानंतर अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीवर अनिश्चित काळ अंधारराज्य होते. परंतु कोरोना कहर कमी झाल्यावर चित्रपटसृष्टी पुन्हा उभरू लागली आहे आणि हिंदी बरोबर मराठी चित्रपटही प्रदर्शनासाठी चित्रपटगृहांची वाट पकडू लागले आहेत. मराठीमध्ये प्रथमच ‘झोंबीज’ जॉनर चा हॉरर चित्रपट बनलाय, ‘झोंबिवली’ (Zombivli). लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. परंतु आता तो लवकरच सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी असंही म्हणता येईल की, येत्या ४ फेब्रुवारी रोजी ‘झोंबिवली’तील लॉकडाउन उठवण्यात येत आहे.

‘झोंबिवली’ या चित्रपटात झोंबीजचा कहर रंगणार असून अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी या त्रिकुटाचा ‘झोंबी’ कल्ला प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘झोंबिवली’ ची निर्मिती यॉडली फिल्म्सच्या बॅनरखाली झाली असून याची प्रस्तुती सारेगमने केली आहे. सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'झोंबिवली' चित्रपटाची रिलीज डेट अनाऊन्समेंट इंस्टा लाईव्ह वरून केली.

जनमनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी अपल्या अनोख्या अंदाजात आज रिलीज डेट अनाऊन्समेंट पोस्टर लाँच केले असून 4 फेब्रुवारी 2022 ला 'झोंबिवली' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे, असे जाहीर केले. तर रसिक प्रेक्षकांना निर्मात्यांची कळकळीची विनंती आहे की ‘झोंबिवली’ मधील लॉकडाऊन संपला असून सर्वांनी ४ फेब्रुवारी ला 'झोंबिवली' स्टेशनवर उतरून हा हॉरर-कॉमेडी प्रवास अनुभवण्यासाठी जवळच्या चित्रपटगृहाच्या वाट धरावी.

ABOUT THE AUTHOR

...view details