महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Bollywood Cororna Update : अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण - Yashomati Thakur Corona Positive

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण ( Actress Swara Bhaskar's corona test positive ) झाली आहे. याबाबत स्वतः अभिनेत्री स्वरा भास्कर हिने माहिती दिली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करुन कोरोना झाल्याची माहिती दिली.

अभिनेत्री स्वरा भास्करला
अभिनेत्री स्वरा भास्करला

By

Published : Jan 7, 2022, 1:28 PM IST

Updated : Jan 7, 2022, 2:50 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. या अभिनेत्रीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ( Actress Swara Bhaskar's corona test positive ) आहे. अभिनेत्री स्वराने स्वतः एक पोस्ट जारी करून चाहत्यांना ही माहिती दिली ( Swara itself informed by making a post ) आहे. स्वराने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, '५ जानेवारी रोजी मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना अहवालात प्राप्त झाला. ज्यामध्ये तिला कोविडची लागण झाली आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करची सोशल मीडियावरील पोस्ट

स्वराने पुढे लिहिले 'हॅलो कोविड... माझी आरटी-पीसीआर चाचणी झाली, जी पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब वेगळे झालो आहोत. मला ताप आहे, डोकेदुखी आहे आणि मी बेस्वाद झाले आहे. लसीचे दोन्ही घेतले आहेत. त्यामुळे आशा आहे की, मी लवकरच बरी होईल.अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, मी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. पण जर कोणी माझ्या संपर्कात आले असेल, तर कृपया त्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्या. दोन मास्क वापरा, स्वतःची काळजी घ्या आणि सर्वजण सुरक्षित रहा. तुम्हा सर्वांचे आभार.'' स्वरा भास्करची ही पोस्ट तिच्या चाहत्यांमध्ये सध्या व्हायरल होत आहे.

तसेच या अगोदर बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमला, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad Corona Positive ), महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur Corona Positive ), आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Corona Positive ) आणि उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना ही कोरोनाची लागण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले की, गुरुवारी मुंबईत कोविड-19 चे 20,181 नवीन रुग्ण आढळले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला.

हेही वाचा -Udayanraje Watched Pushpa The Rise : खासदार उदयनराजे भोसले 'पुष्पा'वर फिदा !

Last Updated : Jan 7, 2022, 2:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details