महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'पठाण'च्या स्पेन शूटिंगमधील चाहत्यांसोबतचे शाहरुखचे फोटो व्हायरल - स्पेन शूटिंगमधील शाहरुखचे फोटो व्हायरल

शाहरुख खानने स्पेनमध्ये 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भारतीय चाहत्यांसोबत पोझ दिली. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्पेन शूटिंगमधील चाहत्यांसोबतचे शाहरुखचे फोटो
स्पेन शूटिंगमधील चाहत्यांसोबतचे शाहरुखचे फोटो

By

Published : Mar 30, 2022, 1:18 PM IST

मुंबई - बॉलीवूडचा 'बादशाह' शाहरुख खानने अलीकडेच त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाचे स्पेन शेड्यूल पूर्ण केले. 'पठाण'ची टीम 15 दिवसांचे येथील शूटिंग पूर्ण करून मायदेशी परतली आहे. मात्र शाहरुख खानने स्पेनमधील चाहत्यांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्पेनच्या या १५ दिवसांच्या शेड्यूलमध्ये शाहरुख आणि दीपिका पदुकोणने चाहत्यांसोबत जोरदार पोज दिल्या हो फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

स्पेन शूटिंगमधील चाहत्यांसोबतचे शाहरुखचे फोटो

सोशल मीडियावर पसरलेली हे फोटो शाहरुख खानच्या फॅन्स क्लबने शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख स्पेनमधील भारतीय चाहत्यांसोबत आनंदाने पोज देताना दिसत आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोणची फॅन फॉलोइंग काही कमी नाही. इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे फोटो इकडे-तिकडे फिरत आहेत.

स्पेन शूटिंगमधील चाहत्यांसोबतचे शाहरुखचे फोटो

शाहरुख खान चार वर्षांनंतर एका चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख शेवटचा झिरो (2018) या चित्रपटात दिसला होता.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकला नव्हता. त्यानंतर त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली होती. आता शाहरुख खान 'पठाण' या चित्रपटातून आपले धडाकेबाज स्टारडम सांभाळण्याचा प्रयत्न करणार आहे.

स्पेन शूटिंगमधील चाहत्यांसोबतचे शाहरुखचे फोटो

शाहरुखच्या चाहत्यांनाही पठाण चित्रपटाकडून खूप आशा आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. त्याचवेळी, SRK+ नावाच्या OTT अॅपवरून शाहरुख खान लवकरच डिजिटल जगताचे दार ठोठावणार असल्याची बातमी आहे.

स्पेन शूटिंगमधील चाहत्यांसोबतचे शाहरुखचे फोटो

हेही वाचा -ऑस्कर 2022 : थप्पड प्रकरणी स्मिथची पत्नी जाडा पिंकेटने सोडले मौन

ABOUT THE AUTHOR

...view details